नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : पूर्वी एखाद्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागायचे. आता मात्र सोशल मीडियामुळे परिस्थिती बरीच बदलली आहे. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण रातोरात प्रसिद्धीझोतात येतात. मागील काही दिवसांपासून शेंगदाणे विकणाऱ्या भुबन बड्याकर यांच्या Kacha Badam गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला (Kacha Badam Song) आणि रातोपात बड्याकर प्रसिद्धीझोतात आले. या गाण्याने भुबन बड्याकर यांचं आयुष्यच बदललं. विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं दिली अजब शिक्षा; आधी आग लावली अन् मग.., VIDEO ज्या भुबन बड्याकर यांना आजपर्यंत लोक शेंगदाणे विकणारा व्यक्ती म्हणून ओळखत होते, तो आज एक गायक म्हणून देशभरात प्रसिद्ध झाला आहे. लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. कच्चा बदाम गाण्यावर फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील सेलिब्रिटीही इन्स्टाग्राम रिल्स बनवत आहेत. कच्चा बदाम गाणं अजूनही लोकांच्या ओठांवर असतानाच आता एका पेरू विकणाऱ्या वृद्धाच्या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे (Guava Song Viral).
कच्च्या बदाम गाण्याच्या धर्तीवर बनवलेलं पेरूचं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्या मधुर आणि दमदार आवाजात आजोबांनी पेरू विकण्यासाठी हे गाणं गायलं आहे, त्यावरून असं जाणवतं की सोशल मीडियावर हे पुढचं ट्रेंडिंग गाणं ठरणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की फेरीवर पेरू विकणारे आजोबा आपल्या पेरूची स्तुती करत गाणं म्हणत आहेत.
27 सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. त्यांच्या या गाण्याची तुलना ‘कच्चा बदाम’ गाण्याशी केली जात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. लोक हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंटही करत आहेत. काही युजर्सनी व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं - चला आता यावर रील्स बनवायला सुरुवात करू भाऊ. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलं - भाऊ, आता याला प्रसिद्ध करू नका. याशिवाय इतरही अनेकांनी या गाण्यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.