रुबी देवी आणि पंकज पासवान
गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 23 जुलै : “ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन…”, हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. मात्र, बिहारच्या जमुईमधून एक अनोखी प्रेम कहाणी घटना समोर आली आहे. यामध्ये नात्याचं आणि वयाचं कोणतंही बंधन उरलं नाही, असा हा प्रकार आहे. या प्रेमसंबंधांमुळे 40 वर्षाची काकू आणि 20 वर्षांच्या पुतण्याचे लग्न लावून देण्यात आले. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लखापूर गावातील ही घटना आहे. येथे एका 40 वर्षांच्या काकूचे तिच्याच 20 वर्षांच्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. रुबी देवी (40) असे या महिलेचे तर पंकज पासवान (20) असे तिच्या प्रियकर पुतण्याचे नाव आहे. महिलेचा पती इंद्रदेव पासवान याला हा प्रकार कळला आणि त्याने संपूर्ण गावकऱ्यांसमोर दोघांचे लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच जमुईच्या लखापूरची ही प्रेमकहाणी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
रुबी देवी आणि पंकज पासवान (20) याच्याशी गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या पतीला याबाबत माहिती नव्हती. दरम्यान हे काकू आणि पुतण्या एकमेकांना पाटण्यात भेटत असत. या महिलेने सांगितले की, त्यांनी यापूर्वीही एकमेकांशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी समाजासमोरही एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले. रुबी देवीचा पती इंद्रदेव पासवान याने सांगितले की, मला पत्नीचे अनैतिक संबंध कुठेतरी सुरू असल्याचा संशय होता. पण मी तिला कधीच रंगेहाथ पकडले नाही. दरम्यान, गेल्या शनिवारी सायंकाळी उशिरा तिला त्याने पकडले आणि यानंतर पंचायत बोलावल्यावर त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पतीनेच आपल्या पत्नीचे लग्न लावून दिले. रुबी देवी शनिवारी सायंकाळी उशिरा तिचा प्रियकर पंकजला भेटायला गेली होती. मात्र, तिचा पती इंद्रदेव पासवानला ही बाब कळताच त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, त्यानंतर दोन्ही प्रेमीयुगुलांनी पलटले. ते म्हणाले की, लग्नाचा करणे हा सक्तीने घेतलेला निर्णय होता. महिलेने सांगितले की, पंकज नेहमी माझ्यासोबत लग्नाबाबत बोलत असे. मी त्याच्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, असे तो मला सांगायचा. यानंतर मी त्याला भेटत राहिली. आता पंकज मला जसे ठेवणार, तसेच मी त्याच्यासोबत राहण्यास तयार आहे, असे या महिलेने सांगितले. तर पंकज पासवान म्हणाला की, यापूर्वीही ही हिला काकू मानत होतो. तसेच आताही ही माझी काकूच आहे. तसेच त्याने या संपूर्ण प्रकरणात आपला सहभाग असल्याचाही इन्कार केला आहे. या घटनेची जिल्ह्यात एकच चर्चा होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर लाखापूर गावात तणावाचे वातावरण होते.