व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: मुली चांगल्या ड्रायव्हर नसतात, असं अनेकवेळा म्हटलं जातं. त्यांना व्यवस्थित आणि योग्यरित्या गाडी चालवता येत नाही असं आपण कायमच ऐकतो. याची अनेक उदारहणेही सोशल मीडियावर आपण पाहतो. अनेक वेळा मुलींसोबत गाडी चालवताना अपघात घडतात. यामुळे त्यांना आणखीनच ट्रोल केलं जातं. याविषयी अनेक फोटो व्हिडीओही इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगी रस्त्याच्या कडेला थोडा वेळ थांबताना दिसत आहे आणि थोड्या वेळाने ही मुलगी उजवीकडे वळते, जिथे तिच्या डाव्या बाजूला एक मोठा नाला आहे. तिथे ही मुलगी एक्सलेटरला खूप वेगाने फिरवते, आणि नाल्यात जाऊन पडते. ज्यामुळे ती या भीषण अपघाताची बळी ठरते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
gieddeee या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर खूप प्रतिक्रियादेखील येत आहेत. अनेकजण या व्हिडीओविषयी खिल्लीही उडवत आहे. तर काहीजण मुलींच्या गाडी चालवण्याविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहेत. तर ते या तरुणीच्या खराब ड्रायव्हिंगला ट्रोल करताना कॉमेंट बॉक्समध्ये दिसत आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी काही वेळातच व्हायरल होतात आणि धुमाकूळ घालू लागतात.
दरम्यान, मुली गाडी चालवताना अपघात घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापहिलेही अशा अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर असे व्हिडीओ कायमच चर्चेत असलेले पहायला मिळतात.