JOIN US
मराठी बातम्या / Viral / भल्यामोठ्या अस्वलाच्या अंगावर बसून व्यक्तीचं भयंकर कृत्य, पाहा काय केलं

भल्यामोठ्या अस्वलाच्या अंगावर बसून व्यक्तीचं भयंकर कृत्य, पाहा काय केलं

जगभरात अनेक पराक्रमी लोक सापडतील. कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. नशेत तर लोक आऊट ऑफ कंट्रोल होऊन अनेक विचित्र गोष्टी करताना दिसतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मार्च : जगभरात अनेक पराक्रमी लोक सापडतील. कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. नशेत तर लोक आऊट ऑफ कंट्रोल होऊन अनेक विचित्र गोष्टी करताना दिसतात. नशेत त्यांना आपण काय करतोय याचं भानदेखील नसतं. त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचाही विचार त्यांना येत नाही. त्यामुळे लोक नशेत बऱ्याचदा नको ते धाडस दाखवताना दिसत आहेत. अशातच एका व्यक्तीचा नशेतील व्हिडीओ समोर आला आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये व्यक्तीने नशेमध्ये काय केलं हे पाहून तुम्हीदेखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये दिसतंय की, मद्यधुंद माणूस अस्वलाच्या पाठीवर बसला आहे. स्वत:वर ताबा ठेवण्याच्या स्थितीत तो नव्हता, तरीही त्याने एका हातात दारुचा ग्लास आणि दुसऱ्या हातात बाटली धरली. आणि अस्वलाच्या पाठीवर बसून याचा आनंद घेताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल व्हिडीओमध्ये अस्वलाच्या पाठीवर बसून दारू पीत असलेल्या नशेत व्यक्तीचे धाडस पाहून लोक थक्क झाले होते . त्याला इच्छा असूनही ओरडता येत नव्हते. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक घाबरले, तर काही यूजर्स असे देखील होते की त्यांना आयुष्यात कधीतरी असा दिवस नक्कीच घालवायचा आहे. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे, ज्यामुळे त्याला 18 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, @TWWLLTM या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. यापूर्वीही लोकांचे नशेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपण विचारही करु शकत नाहीत अशा कृती लोक नशेत करताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या