JOIN US
मराठी बातम्या / Viral / जमिनीपासून 36 हजार फूट उंचीवर जोडप्याचा रोमान्स, हटके अंदाजाने जिंकलं मन

जमिनीपासून 36 हजार फूट उंचीवर जोडप्याचा रोमान्स, हटके अंदाजाने जिंकलं मन

लग्नाची आयुष्यभरासाठी एक छान आठवण रहावी म्हणून लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात. लग्नामध्ये हटके गोष्टी करत अनेक कपल लक्ष वेधत असतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च : लग्नाची आयुष्यभरासाठी एक छान आठवण रहावी म्हणून लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात. लग्नामध्ये हटके गोष्टी करत अनेक कपल लक्ष वेधत असतात. सोशल मीडियावर तर अशा लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील कपलचा हटके डान्स चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नामध्ये वधू वर ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसून येतात. आपल्या हटके डान्सने ते सर्वांची मने जिंकतात. सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये कपलने चक्क 36 हजार फूट उंचीवर हवेत डान्स केला. त्यांचा हटके अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

संबंधित बातम्या

श्रुतिका आणि शुभम त्यांच्या लग्नाला जाताना चार्टर फ्लाइटमध्ये दिसत आहेत. हे दोघेही सुंदर भारतीय पारंपारिक कपडे परिधान करून फ्लाइटमध्ये किंगच्या लोकप्रिय गाण्यावर नाचत आहेत. त्याचवेळी, त्यांच्या डान्सदरम्यान कुटुंबातील सदस्य व्हिडिओमध्ये त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. ही क्लिप इंस्टाग्रामवर जय करमानी नावाच्या युजरने शेअर केली आहे आणि पोस्ट केल्यापासून हा मनोरंजक डान्स व्हिडिओ जवळपास 40 लाख वेळा पाहिला गेलाय. व्हिडीओच्या कॅप्शननुसार, हे कपल 36 हजार फूट उंचीवर डान्स करत होते.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वीही अनेक कपलचे असे हटके व्हिडीओ समोर आले आहेत. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीत पसंती असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या