JOIN US
मराठी बातम्या / Viral / 6 बायकांसोबत झोपायला बनवला 80 लाखांचा बेड, व्यक्तीच्या हटके कृतीची सोशल मीडियावर चर्चा

6 बायकांसोबत झोपायला बनवला 80 लाखांचा बेड, व्यक्तीच्या हटके कृतीची सोशल मीडियावर चर्चा

लग्न हे पवित्र बंधन असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भारतात लग्नासाठी विशेष महत्त्व आहे. काही जण एक लग्न करुनच कंटाळतात मात्र याउलट काहीजण एकापेक्षा अधिक लग्न करताना दिसून येतात.

जाहिरात

6 बायकांसोबत झोपायला बनवला 80 लाखांचा बेड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : लग्न हे पवित्र बंधन असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भारतात लग्नासाठी विशेष महत्त्व आहे. काही जण एक लग्न करुनच कंटाळतात मात्र याउलट काहीजण एकापेक्षा अधिक लग्न करताना दिसून येतात. अनेकांना अधिक लग्न, बायका यामध्ये जास्त रस असलेला पाहिला मिळतो. सध्या असंच काहीसं प्रकरण समोर आलंय ज्यामध्ये एका व्यक्तीने चक्क सहा बायकांसोबत झोपता यावं म्हणून खास बेड बनवला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका व्यक्तीने एकाच वेळी एक-दोन नव्हे, तर नऊ महिलांशी लग्न करून खळबळ उडवून दिली. या व्यक्तीचं नाव आर्थर असं आहे. हे सर्व विवाह एकाच मंडपात पार पडले. आर्थरचे लग्न बेकायदेशीर होते. मात्र त्यानंतरही त्यांच्या लग्नाने चांगलीच चर्चा रंगली होती.

आर्थरला नऊ बायका सांभाळता आल्या नाहीत. आजच्या तारखेत चार बायकांनी त्याला घटस्फोट दिला आहे. अलीकडेच, आर्थरनं 51 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं आहे आणि त्याच्या पत्नींची संख्या 6 वर पोहोचली आहे. आर्थरला त्याच्या प्रत्येक पत्नीला समान प्रेम द्यायचं आहे. कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून त्यानं मोठा पलंग तयार केला आहे. तो या पलंगावर त्याच्या सर्व पत्नींसह झोपेल. त्याला भीती वाटत होती की त्याच्या एका बायकोला वाटेल की तो एकापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणूनच त्याने सर्वांना झोपण्यासाठी हा पलंग बनवला आहे. आर्थरने 6 बायकांसोबत झोपण्यासाठी वीस फुटांचा पलंग बनवण्यासाठी लाखो खर्च केले. हा पलंग वीस बाय सात फूट आहे. तो तयार करण्यासाठी सुमारे 82 लाख रुपये खर्च झाले आहेत. हा पलंग इतका मोठा आहे की आर्थरला तो बेडरुममध्ये जोडण्यासाठी 15 महिने लागले. तसेच, ते बनवण्यासाठी बारा जणांचे कष्ट घेतले. बेड तुटू नये म्हणून सुमारे 950 स्क्रू बसविण्यात आले आहेत. हेही वाचा -  रस्ता ओलांडताना भिंतीवर घातली कार, अपघातानंतर महिलेनं ठोकली धूम, Video व्हायरल बेडच्या मजबुतीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. आर्थरने सांगितले की, अनेकवेळा त्यांना पत्नीसोबत सोफ्यावर झोपावे लागले. पण आता सगळे एकाच बेडवर एकत्र झोपतील. त्याने सांगितले की, त्याला प्रत्येक पत्नीला विशेष वाटावं असं वाटतं. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. दरम्यान, आर्थर आणि त्याची पहिली पत्नी लियाना यांनी 2021 मध्ये अनेक विवाह करण्याचा विचार केला होता. यानंतर त्याने चर्चमध्ये नऊ महिलांशी लग्न केले. त्याच्या चित्रांनी इंटरनेटवर आग लावली. पण हळूहळू त्याच्या बायकांना हेवा वाटू लागला. यानंतर चौघींनी त्याला घटस्फोट दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या