अनोखा पलंग
कासिम खान, प्रतिनिधी नूंह, 5 जुलै : तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एकाहून एक मजबूत लाकडी, लोखंडी, स्टीलचे पलंग पाहिले असतील. पण आज या पलंगबाबत वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्च होईल. हरयाणाच्या नुहच्या पुन्हाना येथील लुहिंगाकलां गावात असा लोखंडी पलंग आहे, ज्यावर 7-8 लोक एकत्र झोपू शकतात. एवढेच नाही तर या बेडवर चढण्यासाठी शिडीही बनवण्यात आली आहे. बेडची लांबी 12 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. काही दशकांपूर्वी हा पलंग 12 हजार रुपयांना बांधला गेला होता. याशिवाय आणखी एक बेड ज्याची लांबी 8 फूट आणि रुंदी 6 फूट आहे.
हा पलंगही या परिवाराजवळ आहे. हा पलंग शीशम लाकडाचा आहे. या एका पलंगावर 3-4 जण आरामात झोपू शकतात. हे दोन्ही पलंग त्यांच्या आकारानुसार लोकांच्या आकर्षित करत असून लोकांना ते आवडत आहेत.
नूह येथील मोहम्मद हनिफ यांनी हे पलंग बनवले होते. पाच वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. लुहिंगाकलां गाव आज मो. हनीफ यांनी बनवलेल्या या अनोख्या पलगांमुळे संपूर्ण हरियाणामध्ये प्रसिद्ध आहे.