JOIN US
मराठी बातम्या / Viral / 7 वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधल्यावरही ओळखून घेते नोटा, पाहा VIDEO

7 वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधल्यावरही ओळखून घेते नोटा, पाहा VIDEO

7 वर्षांच्या प्रेक्षाकडे पाहून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल.

जाहिरात

प्रेक्षा चौधरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहन ढाकले, प्रतिनिधी बुरहानपुर, 24 जून : तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण एक 7 वर्षांची मुलगी डोळ्या पट्टी बांधून चक्क अभ्यास करते. तसेच ती हातात दिलेली नोट किती रुपयांची आहे, हे सुद्धा ओळखते. इतकंच नाही, तर त्या नोटवरील नंबर काय आहे, हेसुद्धा ती सांगते. प्रेक्षा चौधरी असे या मुलीचे नाव आहे. ती 7 वर्षांची असून मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूरच्या इंदिरा कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. काय म्हणाली प्रेक्षा चौधरी - ही जादू नाही तर मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन आहे. याबाबत प्रेक्षा चौधरी सांगते की, पूर्वी तिला अभ्यासात खूप अडचणी येत होत्या, पण ती मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन शिकले, त्यामुळे आता तिला अभ्यास करणेही सोपे होत आहे. तर मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनमुळे प्रेक्षा हिच्या अभ्यासात फरक पडला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून अभ्यास करताना ती आता फोटो आणि नोटाही ओळखते, अशी माहिती प्रेक्षा चौधरी हिच्या आई कोमल चौधरी यांनी दिली.

गौतम सोनवने (रा. श्रीनगर कॉलनी, बुऱ्हाणपूर) यांनी आपली नोकरी सोडली आणि मिड-ब्रेन अॅक्टिव्हेशनद्वारे ते आता आपल्या शहरातील मुलांचा मेंदू विकसित करत आहेत. त्यांच्या पत्नी एकता सोनवने यासुद्धा त्यांच्या या कार्यात मदत करत आहेत. गेल्या 8 वर्षांत गौतम यांनी 500 हून अधिक मुलांचा मेंदू विकसित केला आहे. आता ही मुलं डोळ्यांवर पट्टी बांधून नोटा ओळखण्यासोबतच अभ्यासही करतात.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचे विद्यार्थीही त्यांच्याकडे ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत. याबाबत प्रशिक्षक गौतम सोनवने यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि शिक्षकांना मुलांच्या शिक्षणाची चिंता असते. मात्र, यावर कोणाकडे उपाय नाही. जपानच्या मिड-ब्रेन अॅक्टिव्हेशनद्वारे या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मेंदूचा विकास केला जात आहे. आता ही मुले अभ्यासातही प्रगती करत आहेत. गेल्या 8 वर्षांत मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील सुमारे 500 मुलांचा मेंदू विकसित केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यामध्ये प्रेक्षा चौधरी या 7 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या