JOIN US
मराठी बातम्या / Viral / 1 शिकार 6 दावेदार! एका हरणासाठी सिंहांची आपसात झुंज; थरारक VIDEO

1 शिकार 6 दावेदार! एका हरणासाठी सिंहांची आपसात झुंज; थरारक VIDEO

एका हरणावर सहा सिंह अक्षरश: तुटून पडले आहेत.

जाहिरात

एका हरणाभोवती सहा सिंहांचा कळप.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : कळपाने शिकार करणाऱ्या सिंहांना (Lion) तुम्ही पाहिलं आहे. अशाच एका शिकारावर सिंह (Lion video) अक्षरश: तुटून पडले आहेत, तेसुद्धा झाडावर. एका शिकारासाठी सिंहांची आपसात झुंज झाली आहे. झाडावरच चक्क सहा सिंह एका शिकारावर टपून बसले आहेत (Lion fighting video) . एका शिकारावर सहा सहा सिंह दावेदार म्हणून हजर झाले. एका हरणासाठी ते एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले आहेत. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

संबंधित बातम्या

आयएफएस अधिकारी साकेत बडोला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जंगलात जिवंत राहायचं असेल तर आपल्या खाण्यावर हक्क दाखवावा लागतो नाहीतर दुसरा कुणी तरी त्यावर दावा ठोकतो, असं या व्हिडीओतून दिसून येतं. हे वाचा -  अस्वलाची शिकार करायला गेला आणि स्वतःच ठोकली धूम; वाघासोबत नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओत पाहू शकता झाडावर एक हरण लटकतं आहे. पण एक हरण खाण्यासाठी सिंहांचा कळपच आला आहे. एकेएक करत सिंह झाडावर चढले आहेत. कुणी हरणाचं डोकं आपल्या जबड्यात धरलं आहे, तर कुणी पाय. तब्बल सहा सिंह त्या एका हरणावर टपले आहेत. ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्न ते हरण झाडावरून धाडकन जमिनीवर कोसळतं. त्यानंतर सिंह पळत येत त्याभोवती जमा होतात. हे वाचा -  देव तारी त्याला कोण मारी! भरधाव गाड्या अंगावरून जाऊनही कुत्र्याला काही झालं नाही एक शिकार, कित्येक दावेदार. जंगलात असंच होतं. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओमध्ये दिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या