प्रतीकात्मक फोटो
मुंबई, 04 मे : दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षांची भीती वाटते. प्रश्नांची उत्तरं आपल्याला येतील की नाही, याचं टेन्शन असतं. पण सध्या सोशल मीडियावर तर चक्क पाचवी इयत्तेतील पेपरमुळे सर्वांना घाम फुटला आहे. हा पेपर सोडवण्यात भलेभले तज्ज्ञही फेल झाले आहेत. कित्येकांना हा साधा पाचवीचा पेपर सोडवणंही जमलं नाही. त्यामुळे जो ही प्रश्नपत्रिका सोडवेल तो खरा जिनियस ठरेल. पाचवीच्या या प्रश्नपत्रिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाचवीच्या सहामाही परीक्षेचा हा पेपर आहे. अशी प्रश्नपत्रिका पाहून कित्येकांना धक्का बसला आहे, पदवीधरांनाही या पाचवीच्या प्रश्नाची उत्तरं देणं जमलेलं नाही.
प्रश्नपत्रिकेत तुम्ही पाहाल तर इयत्ता पाचवी असं लिहिलं आहे. 100 गुणांची ही परीक्षा आहे. उत्तीर्ण होण्यासाठी 33 गुण आवश्यक असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. पेपरमध्ये फक्त 10 प्रश्न देण्यात आले असून ते सोडवण्यासाठी 2.30 तासांचा अवधी देण्यात आला आहे. 10 पैकी 8 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. उगाच मुलींना म्हणत नाहीत पापा की परी; हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात आर्थिक गणित, कॉमर्सशीसंबंधित विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. असं असून कॉमर्समधील तज्ज्ञांनाही याची उत्तरं देता आली नाही आहेत. तुम्ही नीट पाहिलं तर हा पेपर आताच्या पाचवीतील नाही. तर बरचा जुना आहे. 1943 सालातील ही प्रश्नपत्रिका असल्याचं सांगितलं जातं आहे. हा पेपर पाहिल्यानंतर तेव्हाच्या पाचवीच्या तुलनेत आताची दहावी, बारावीची परीक्षाही सोपी वाटेल.
आता तुम्ही एकदा प्रयत्न करून पाहा. हा पाचवीचा पेपर तुम्ही सोडवू शकलात, तर तुम्ही जिनिअस ठराल. चला तर मग दाखवून द्या सर्वांना तुम्हीच आहात हुश्शार.