JOIN US
मराठी बातम्या / Viral / 3 दिवसांच्या बाळाने रुग्णालयात जे केलं, ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा VIRAL VIDEO

3 दिवसांच्या बाळाने रुग्णालयात जे केलं, ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा VIRAL VIDEO

या बाळाने केलेली कृती ही त्या वयातल्या बाळाने करणं अपेक्षितच नाही.

जाहिरात

चालणारं नवजात बाळ (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 जून : नवजात बाळांची शारीरिक वाढ टप्प्याटप्प्याने होते. ते तीन महिन्यांचं झाल्यावर या अंगावरून दुसऱ्या अंगावर व्हायला शिकतं. तर, सहा महिने ते एक वर्षांचे होईपर्यंत रांगणं आणि नंतर चालणं शिकतात. पण, सध्या एका बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण या बाळाने केलेली कृती ही त्या वयातल्या बाळाने करणं अपेक्षितच नाही. तीन दिवसांच्या या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे आश्चर्यकारक प्रकरण अमेरिकेतून समोर आलंय. या मुलीची आई सामंथा मिटशेलने तिच्या लेकीबद्दल काही खुलासे केले आहेत, जे ऐकून नेटकरीही चक्रावले आहे. तिने केलेल्या दाव्यांवर अनेकांना विश्वास नाही. सामंथा मिटशेल नक्की काय म्हणाली आहे आणि या तीन दिवसांच्या मुलीनं नेमकं काय केलंय, ते जाणून घेऊयात. सामंथा मिटशेलने ‘केनेडी न्यूज’ला सांगितलं की तिची मुलगी जन्मल्यापासूनच तिचं डोकं हलवण्याचा आणि रांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझी मुलगी कधीच नवजात नव्हती, असं वाटत असल्याचं सामंथा म्हणाली. अवघ्या तीन दिवसांत या मुलीने चालायला सुरुवात केली होती, असा दावाही तिने केला आहे. ‘डेली मेल’शी बोलताना सामंथाने सांगितलं की, जेव्हा मी तिला पहिल्यांदा चालण्याचा प्रयत्न करताना पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. तीन दिवसांच्या बाळाला असं चालताना मी कधीच पाहिलं नाही. त्यावेळी माझ्यासोबत फक्त माझी आई हॉस्पिटलच्या खोलीत होती. तिने मला मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं. कारण, व्हिडिओ नसता रेकॉर्ड केला तर मी जे म्हणतेय त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. त्यावेळी माझा पार्टनरही तिथे नव्हता, त्यामुळे व्हिडिओ नसता तर कदाचित त्यानेही यावर विश्वास ठेवला नसता. गाडीच्या स्टेअरिंगमध्ये अडकलं तरुणाचं डोकं अन्….धक्कादायक Video व्हायरल ही मुलगी Nyilah Daise या रुग्णालयाच्या बेडवर पलटताना व पुढे सरकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडिओत समांथाच्या आईचा आश्चर्याने ओरडण्याचाही आवाज येतोय. हा व्हिडिओ जुना असून आपली लेक आता तीन महिन्यांची झाली आहे, असंही तिने सांगितलं. अवघ्या तीन महिन्यांची मुलगी सपोर्टने उभी राहू लागली आहे आणि ही सामान्य गोष्ट नाही. सामंथाने सांगितलं की तिची लेक तिला दररोज आश्चर्यचकित करत आहे. ‘ती अवघ्या दीड महिन्यांची असताना तिने बोलण्याचा प्रयत्न केला. ती माझी नक्कल करत असते. आम्ही तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं की ती तसंच बोलण्याचा प्रयत्न करते’ असंही ती म्हणाली. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत कमेंट्स करत आहेत. तुझी मुलगी जादुई आहे, असं काहींनी म्हटलं, तर काहींनी हे कलियुग आहे आणि इथं काहीही होऊ शकतं, अशा कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या