JOIN US
मराठी बातम्या / Viral / जेव्हा आपसात भिडले 2 King Cobra; अंगावर काटा आणणारा VIDEO, रंजक आहे लढाईचं कारण

जेव्हा आपसात भिडले 2 King Cobra; अंगावर काटा आणणारा VIDEO, रंजक आहे लढाईचं कारण

King Cobra Video: या व्हिडिओमध्ये दोन किंग कोब्रा साप आपसात भिडल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य खरंच भीतीदायक आहे. हैराण करणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी: सोशल मीडियावर प्राण्यांचं वेगळंच क्रेज आहे. प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडतो तर काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. मात्र, प्राण्यांसोबतच सापाच्या व्हिडिओलाही सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. प्रत्यक्षात साप समोर दिसताच अनेकांना घाम फुटतो. मात्र इंटरनेटवर अनेक हैराण करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Cobra Fight Video) होत आहे. OMG! ऑमलेटसाठी फोडलं अंडं आणि…; जे बाहेर पडलं ते पाहून सर्वजण शॉक; VIDEO VIRAL या व्हिडिओमध्ये दोन किंग कोब्रा साप आपसात भिडल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य खरंच भीतीदायक आहे. हैराण करणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सापाला पाहूनच लोकांना घाम फुटतो. मात्र तुम्ही कधी दोन किंग कोब्राला आपसात लढताना पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने हे दोन साप आपसात भिडतात ते पाहून तुम्हीही घाबराल.

एका जंगलात दोन साप आमनेसामने आले. यानंतर जे काही घडलं, ते खरंच हैराण करणारं होतं. दोन्ही कोब्रा साप आपसात भिडतात आणि बराच वेळ दोघांची फाईट सुरू असते. व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजरने या फाईटचं कारणही सांगितलं आहे. त्याने दोघांच्या लढाईचं कारण एक फिमेल कोब्रा असल्याचं सांगितलं. दोघंही फिमेल कोब्रासमोर आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्यासाठी लढत आहेत. दुचाकी चोरायला आले; पण डाव पलटला अन् स्वतःची गाडी सोडून ठोकावी लागली धूम, VIDEO व्हायरल होणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. आतापर्य़ंत 2 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या