JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका बॉयफ्रेंडसाठी 2 गर्लफ्रेंडचा राडा! एकमेकींच्या जीवावर उठल्या; काय झाला शेवट पाहा VIDEO

एका बॉयफ्रेंडसाठी 2 गर्लफ्रेंडचा राडा! एकमेकींच्या जीवावर उठल्या; काय झाला शेवट पाहा VIDEO

एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड्सनी भररस्त्यात फायटिंग केली आहे.

जाहिरात

एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या दोन गर्लफ्रेंड्स.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 18 सप्टेंबर : अनेकांना आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कुणासोबत जवळीक वाढवलेली आवडत नाही. विशेषतः महिला याबाबत खूपच इमोशनल असतात. नवरा असो वा बॉयफ्रेंड तो दुसऱ्या महिलेसोबत दिसला की त्यांचा संताप होतो. मग त्या दुसऱ्या महिलेलाही सोडत नाहीत. आपल्या पार्टनरच्या आयुष्यात असलेल्या त्या दुसऱ्या महिलेवर सूड उगवणारी बायको किंवा गर्लफ्रेंड तुम्ही फिल्ममध्ये पाहिलीच असेल. पण प्रत्यक्षातही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एकाच बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड आपसात भिडल्या आहात. भररस्त्यात या दोघींनी एका तरुणासाठी राडा घातला आहे. दोघीही अक्षरशः एकमेकींच्या जीवावर उठल्या आहेत. व्हिडीओत पाहू शकता दोन तरुणी रस्त्यात एकमेकींशी फाइट करताना दिसत आहे. दोघींनीही एकमेकांना धरलं आहे. एकमेकांचे केस खेचत आहेत, झिंझ्या उपटत आहे. त्यानंतर दोघीही एकमेकांना सटासट कानाखाली मारताना दिसत आहेत. हे वाचा -  ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO त्याच्या आजूबाजूला तरुण-तरुणी दिसत आहे. सुरुवातीला ती तरुणी या दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. पण दोघीही ऐकत नाहीत. दोघींपैकी एकही मागे हटत नाही. तिथंच आणखी एक तरुण आहे, तो तर या तरुणींची फायटिंग पाहून इतका घाबरला आहे की त्यांच्यात पडण्याची त्याची हिंमतही नाही. तिथं असलेल्या लोकांना तो बोलावतो आणि यांना थांबवा असं सांगताना दिसतो.

संबंधित बातम्या

बराच वेळ दोघी अशाच लढत राहतात. थोड्या वेळाने आपोआप शांत होतात आणि लढाई थांबवून भांडताना दिसतात. त्यानंतर आपापल्या मार्गाने निघून जातात. हे वाचा -  बापरे! 43 वर्षात पठ्ठ्याने केली 53 लग्नं; अतिशय विचित्र आहे कारण ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बिहारमधील आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार एका बॉयफ्रेंडसाठी या दोघी तरुणी लढत होत्या, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या