हाऊस वाईफ CV
नवी दिल्ली, 29 जुलै : अनेक महिला नोकरी करतात तर काही गृहिणी असतात. गृहिणीचं काम सर्वात जास्त अवघड असल्याचं म्हटलं जातं. कारण महिलांना घरी काम करण्यासाठी 8, 9 तासांचं बंधन नसून तिचं काम सतत सुरु असतं. एवढंच नाही तर तिला आठवड्याची सुट्टीही नसते. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेनं तिचा CV बनवला तर कसा असेल याचा कधी विचार केलाय का? सध्या एका गृहिणी महिलेचा CV समोर आला आहे. जो काहीच वेळात इंटरनेटनर जोरादार व्हायरल होताना पहायला मिळाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एका महिलेच्या सीव्हीची चर्चा रंगली आहे. महिलेनं आपल्या सीव्हीमध्ये तिच्या कामांचा, वेळेचा सर्व लेखाजोखा नमूद केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
सीव्हीमध्ये लिहिल्याप्रमाणे, ही महिला फेब्रुवारी 2008 ते जुलै 2009 या काळात न्यूयॉर्कपर्यंत एका रिक्रूटिंग कंपनीत काम करत होती. त्यानंतर ऑगस्ट 2009 पासून ती टेक्सास, अमेरिका आणि नवी दिल्ली येथे गृहिणी म्हणून काम करतेय. नोकरी म्हणून तिनं सीव्हीमध्ये होममेकर लिहिलं आहे, त्यासोबत तिनं तिचे कामही सांगितलं आहे. ती वेळेची पक्की आहे आणि तिची दैनंदिन कामे तिच्या पद्धतीने करते. त्यानंतर ती लिहिते की, ती घरच्या सर्व जबाबदाऱ्या एकटी पार पाडत आहे. महिलेने 13 वर्ष कामाचा अनुभव सांगितलाय.
महिलेने पुढं लिहिलं की, जेव्हापासून तिची मुले झाली तेव्हापासून ती तिच्या दोन्ही मुलांची खूप काळजी घेत आहे. ती त्यांना त्यांच्या गृहपाठात मदत करते, प्रकल्प बनवते, त्यांच्या विकासाला मदत करते आणि त्यांच्या अभ्यासाची आणि खेळाची काळजी घेते. यासोबतच ती कुटुंबातील इतर सदस्यांचीही काळजी घेते.
दरम्यान, LinkedIn वापरकर्ता युगांश चोक्राने अलीकडेच हा सीव्ही शेअर केला होता. सीव्ही शेअर करत त्यानं लिहिलं की, हे देखील खूप महत्त्वाचे काम आहे, ज्याला लोक काम मानत नाहीत.