JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! सोफ्याने घेतला 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; नेमकं काय घडलं पाहा

धक्कादायक! सोफ्याने घेतला 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; नेमकं काय घडलं पाहा

मृत मुलाच्या आईनेच आपल्या बाळाच्या मृत्यूची भयानक आणि वेदनादायी कहाणी सांगितली आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : लहान मुलांच्या बाबतीत छोटासा निष्काळजीपणाही त्यांच्या जीवावर बेतू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सोफ्याने 11 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतला आहे. मृत मुलाच्या आईनेच आपल्या बाळाच्या मृत्यूची भयानक आणि वेदनादायी कहाणी सांगितली आहे. जी वाचूनच अंगावर काटा येईल.

लॉस वेगसमध्ये राहणारी निकाइला बियेर नावाची ही महिला. जी आपल्या कुटुंबासह नव्या घरात शिफ्ट झाली. पण यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते भय़ंकर आहे. तिचा लहान मुलगा राइडरने या घरात जीव गमावला आणि याचं कारण म्हणजे सोफा. घटनेच्या 6 महिन्यांनंतर त्यांनी आपली ही वेदनादायी कहाणी लोकांसोबत शेअर केली आहे. निकाइला म्हणाला, “आमचा दुसरा मुलगा राइडरच्या जन्मानंतर आम्ही दोघं याच वर्षात एप्रिलमध्ये नव्या आणि मोठ्या घरात शिफ्ट झालो. पण 8 मे 2022 हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस. यादिवशी सर्वकाही उद्ध्वस्त झालं” हे वाचा -  धक्कादायक! अवघ्या 23 दिवसांची नवजात चिमुकली ‘प्रेग्नंट’; बाळाच्या पोटात तब्बल 8 भ्रूण, डॉक्टरही शॉक निकाइलाने सांगितलं, “त्या दिवशी दुपारी सर्व काम केल्यानंतर मी घराचे सर्व दरवाजे बंद करत होती. तेव्हा राइडर तिथं होता. एका मिनिटासाठी मी टॉयलेटला गेले. मला खेळणं पडल्यासारखा आवाज आला. तेव्हा माझी मोठी मुलगी ऑब्रियेना राइडरला हाक मारत टॉयलेटपर्यंत आली. नंतर आम्ही घरभऱ शोधलं पण राइडर कुठेच दिसला नाही. मी खूप घाबरले” निकाइला पुढे म्हणाली, “मला काहीच समजत नव्हतं. शेवटी मी माझ्या घरातीलसोफ्याजवळ गेले. आम्ही तो सोफा गेल्या वर्षीच घेतला होता. तो एक इलेक्ट्रिक रिक्लाइनर सोफा होता. जो बटणाने कंट्रोल होत होता. मी सोफ्याचं बटण दाबलं आणि सोफा पूर्ण उघडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या काळजाचा तुकडा सोफ्याच्या रिक्लाइनिंग पाइपमध्ये अडकला होता. त्याचा चेहरा निळा पडला होता. तो इथं अचानक कसा आला, हे सर्व काय झालं काहीच समजत नव्हतं” हे वाचा -  ‘मला माझा मृत्यू दिसत होता’, सोशल मीडिया वापरणाऱ्या महिलेची झाली भयानक अवस्था निकाइला स्वतःला आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार मानते.  मी तो रिक्लाइनर सोफा घरी आणला नसता आणि राइडरसोबत असं काही घडलंच नसतं, असं ती म्हणते. अद्यापही निकाइला आणि तिचं कुटुंब या धक्क्यातून सावरलं नाही आहे. आपल्या मुलांबाबत असा निष्काळजीपणा करू नका, असं आवाहन त्यांनी इतर पालकांना केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या