पाणबुडी दुर्घटना
वाशिंग्टन 29 जून : अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता पाणबुडीच्या मलब्यात मानवी अवशेष सापडले आहेत. एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हे अवशेष वैद्यकीय पथकाकडे तपासणीसाठी पाठवले जातील. बुधवारी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी अटलांटिक महासागरात गेलेल्या बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष बाहेर काढण्यात आले. यूएस कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी ते कॅनडाच्या सेंट जॉन बंदरात आणले. 18 जूनच्या संध्याकाळी को पायलटसह चार पर्यटक समुद्रात गेले होते. यानंतर पाणबुडी संपर्काबाहेर गेली आणि त्यानंतर काही दिवसांनी तिचा स्फोट झाला. या घटनेत पाणबुडीत उपस्थित पाच जणांचा मृत्यू झाला. पाणबुडीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुमारे चार दिवस सुरू राहिले आणि त्यानंतर 23 जून रोजी टायटॅनिकच्या अवशेषापासून 1600 फूट अंतरावर पाणबुडीचे अवशेष सापडले. टायटन पाणबुडीमध्ये ब्रिटीश व्यापारी हमिश हार्डिंग, फ्रान्सचे डायवर पॉल हेन्री, पाकिस्तानी-ब्रिटिश उद्योगपती शाहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान आणि ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश यांचा समावेश होता. Titan submarine : ज्या पाणबुडीत गेला 5 अब्जाधीशांचा जीव; इतकं कोटी होतं त्याचं तिकीट समुद्रात उतरताच पाणबुडी बेपत्ता झाली भारतीय वेळेनुसार ही पाणबुडी 18 जूनच्या संध्याकाळी 5.30 वाजता अटलांटिक महासागरात उतरली होती. ती सुमारे 1 तास 45 मिनिटांनी बेपत्ता झाली. 21 जून रोजी, कॅनडाच्या बाजूने शोध मोहिमेत सामील असलेल्या एका विमानाने सोनार-बॉयच्या मदतीने काही आवाज ऐकले होते. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, हे आवाज टायटॅनिकचे अवशेष असलेल्या ठिकाणाजवळ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या ‘टायटन’ या पाणबुडीत झालेल्या स्फोटानंतर त्याचा मलबा पृष्ठभागावर आला. सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड आणि लॅब्राडॉरमधील बंदरातील अवशेष हे पाणबुडीचा स्फोट कसा झाला आणि पाच जणांचा मृत्यू झाला याबाबतच्या तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. कॅनेडियन जहाज होरायझन आर्क्टिकने पाणबुडीचे अवशेष शोधण्यासाठी टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळील समुद्रतळात रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV) चा शोध घेतला.