हिऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर इतर रत्नांमध्ये हिरे घालण्याचा ट्रेंड सध्या खूप वाढला आहे. सोन्या-चांदीप्रमाणेच लोक हिरे दागिने म्हणून घालतात. हिरा घालणे हे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. हिरा दिसायलाही आकर्षक असल्याने तो प्रत्येकाला धारण करायचा असतो. पण ज्योतिष शास्त्रात अशा 5 राशी सांगितल्या आहेत, त्या राशीच्या लोकांनी हिरा घालू नये. या 5 राशींबद्दल आचार्य गुरमीत सिंह यांनी दिलेली माहिती पाहुया.
व्हिक्टोरिया, 1 मे : जगातील सर्वात मोठ्या निळ्या हिऱ्याचा नुकताच लिलाव (Largest Blue Diamond Auction) झाला आहे. त्याची किंमत 57.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 4.4 अब्ज रुपये होती. फाईन आर्टस् (ललित कला) कंपनी सोथेबीजने हाँगकाँगमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला. Sotheby’s च्या मते, 15.10-कॅरेट स्टेप कट रत्नाला ‘द डी बियर्स कलिनन ब्लू’ असं नाव देण्यात आलं आहे. चार खरेदीदारांमधील बोली-युद्ध आठ मिनिटे सुरू राहिलं. एका अज्ञात खरेदीदाराने कॉल केला आणि हिऱ्यासाठी 48 दशलक्ष डॉलर्सची सर्वोच्च बोली लावली. हा दुर्मिळ हिरा 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील कलिनन खाणीत सापडला होता. रंगीत हिऱ्यांमध्ये त्याचं सर्वोच्च स्थान आहे. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेने (GIA) दागिन्यांचं वर्गीकरण ‘फॅन्सी व्हिव्हिड ब्लू’ म्हणून केलं आहे, असं सोथेबीच्या निवेदनात म्हटलं आहे. संस्थेला आतापर्यंत पाठवलेल्या सर्व निळ्या हिऱ्यांपैकी, त्याची रंग प्रतवारी सर्वात वरची आहे, जी आतापर्यंतच्या केवळ एक टक्का हिऱ्यांमध्ये दिसते. हे वाचा - म्हणे, तोफगोळा घेऊन घरी जाऊ का? विमानतळावर एकच गोंधळ आणि पळापळ VIDEO सोथबीजने या हिऱ्याचं वर्णन अपवादात्मक दुर्मीळ असं केलं आहे आणि सांगितलं की आतापर्यंत फक्त 10 कॅरेटपेक्षा जास्त असलेले केवळ पाच हिरे लिलावासाठी आले आहेत. यातील कधीही कोणताही हिरा 15 कॅरेटपेक्षा जास्तीचा नाही. या हिऱ्याचा लिलाव ही एक महत्त्वाची घटना आहे. De Beers Cullinan ब्लू डायमंड 57,471,960 डॉलर्समध्ये लिलाव करण्यात आला. सर्वात महागडा हिरा होण्याचा विक्रम करण्यात हा हिरा थोडक्यात चुकला. हे वाचा - ROBO Taxi… भारताच्या शेजारच्या या देशात धावू लागली चालकविरहित टॅक्सी आजपर्यंतचा सर्वात महागडा हिरा 14.62 कॅरेटचा “ओपेनहायमर ब्लू” आहे. त्याचा 2016 मध्ये 57,541,779 डॉलर्स (रु. 4,404,218,780) मध्ये लिलाव झाला होता. या दोन हिऱ्यांच्या किमतीत 70 हजार डॉलर्सचा फरक होता.