JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Corona ची लस घेताच गेली नोकरी, कारण वाचून बसेल जबर धक्का

Corona ची लस घेताच गेली नोकरी, कारण वाचून बसेल जबर धक्का

अनेक ठिकाणी लस घेणं बंधनकारक करण्यात आलं असताना एका महिलेला मात्र कोरोनाची लस घेतल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिडनी, 20 डिसेंबर: एका महिलेनं (Woman) कोरोना प्रतिबंधक लस (Anti Covid Vaccine) गेल्याच्या कारणावरून तिला नोकरीवरून काढून टाकण्यात (Lost her job) आलं. ज्या चर्चमध्ये (Church) ही महिला नोकरी करत होती, त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणं हे ईश्वरी मर्जीविरोधात (Against god) असल्याचं कारण देत तिची नोकरीवरून हकालपट्टी केली. जगात सर्वत्र कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. अनेक कंपन्यांनी तर कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे. अनेक सरकारी योजनांसाठी कोरोना लसीकरण झाल्याचं सर्टिफिकेटही सक्तीचं केलं जातं. मात्र ऑस्ट्रेलियात घडलेला हा किस्सा धक्कादायक मानला जात आहे. चर्चेमध्ये करत होती नोकरी ऑस्ट्रेलियातील लॅनी चॅट नावाची महिला एका चर्चमध्ये नोकरी करत होती. ऑफर उबंटू नावाच्या चर्चमध्ये गेल्या काही दिवसांपासून ती काम करत होती. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने लस घेतली. तिने लस घेतल्याचं जेव्हा चर्चला समजलं, तेव्हा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी लॅनीला नोकरीवरून काढून टाकलं. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास चर्चने मनाई केली आहे. चर्चच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही लस टोचून घेऊन नये, असे आदेशच चर्चच्या वतीनं काढण्यात आले आहेत. तरीही महिलेनं लस घेतल्याचं सांगत तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे वाचा-  लेबर रुममध्ये बाळाला जन्म देत होती महिला, तेवढ्यात आला EX Boyfriend म्हणे लस ईश्वरविरोधी कोरोना प्रतिबंधक लस घेणं ही ईश्वरविरोधी असल्याचं चर्चनं म्हटलं आहे. वास्तविक, चर्चकडून सर्व प्रकारच्या हेल्थकेअरचा खर्च करण्यात येतो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर चर्चकडून गुंतवणूकही केली जाते. मात्र कोरोना प्रतिबंधक लस हा अनैसर्गिक आणि ईश्वरी मर्जीविरोधातील प्रकार असून त्यासंबंधीच्या नियमांचं पालन न केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं चर्चकडून सांगण्यात आलं आहे. महिलेला न्यायालयात जाण्याची मुभा आहे, मात्र चर्च आपला निर्णय मागे घेणार नाही, असा फैसला चर्चने सुनावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या