ताइपे, 11 सप्टेंबर : एकीकडे चीन-अमेरिका आणि भारत-चीननंतर (India-china face off) आता आणखी देशानं चीनची कोंडी करण्यात सुरुवात केली आहे. चीनच्या शेजारी देश असलेल्या तैवाननं चीनला धमकी दिली आहे. तैवानचे (Taiwan) उपराष्ट्रपती लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांनी चीनला मर्यादा ओलांडण्याची चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तैवानने स्पष्टपणे सांगितले आहे की, चिनी लढाऊ विमाने सीमेचे सतत उल्लंघन करीत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. चिनी लढाऊ विमानांनी तैवान सीमेवर आतापर्यंत तीन वेळा घुसखोरी केली आहे. तैवानचे उपराष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी ट्वीट केले आहे की, “चीनने आज पुन्हा तैवानच्या एअर डिफेन्स विभागात आपल्या लढाऊ विमान उड्डाण केले. त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये, तैवान शांतीप्रिय देश आहे मात्र आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू”. तैवानने म्हटले आहे की बुधवारी आणि गुरुवारी चिनी विमानांनी दोनदा त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. वाचा- ‘…तर चीनची गय करणार नाही’, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशार
वाचा- US आर्मीचं चीनला उत्तर! व्हिडीओ गेमप्रमाणे एका क्षणात खाली पाडलं क्रुझ मिसाइल तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सविस्तर माहिती न देता म्हणाले की, लष्कराला चीनच्या सैन्य विमानांच्या कृत्येविषयी पूर्ण माहिती आहे आणि ‘वाजवी उत्तर’ देण्यास तयार आहे. चीन 2 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या तैवानला आपलं प्रदेश मानतो. तैवानने म्हटले आहे की चीनच्या या कारवायांमुळे संपूर्ण प्रदेश धोक्यात आला आहे. वाचा- India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती याआधी चीनने केली होती घुसखोरी महिन्याभरापूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या आखातीमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चिनी सैन्य लढाऊ सैनिकांचा मागोवा घेण्यास सांगितले होते. या विमानाचा पाठलाग करण्याचा दावाही केला आहे. चीनच्या हवाई दलाच्या या कारवाईवर तैवानने आक्षेप घेतला होता. गेल्या आठवड्यात अमेरिकेने आपला गायडेड डेस्ट्रॉयर तैवानच्या आखातीमध्ये तैनात केले होता. विशेष म्हणजे अमेरिकेने यापूर्वी ही घोषणा केली नव्हती. मात्र दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात डेस्ट्रॉयर पाठविले. तसेच, अमेरिकेच्या एनएसएने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले की तैवानवर हल्ला झाला तर अमेरिका गप्प बसणार नाही.