JOIN US
मराठी बातम्या / विदेश / क्या बात! फक्त चिकन खा आणि मिळवा 1 लाख रुपये पगार, Job साठी असं करा अप्लाय

क्या बात! फक्त चिकन खा आणि मिळवा 1 लाख रुपये पगार, Job साठी असं करा अप्लाय

यूकेची प्रसिद्ध फिश फिंगर कंपनी BirdsEye मध्ये सध्या टेस्ट टेस्टरसाठी जागा (Product Tester Vacancy in UK) आहेत. हे लोक अशा व्यक्तीला शोधत आहेत, जो चिकन डीपर्सची परफेक्ट टेस्ट निवडू शकेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : कोरोनाकाळात (Coronavirus) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नवी नोकरी मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही अनेकांनी नोकरी मिळत नाहीये. अशातच तुम्ही जर स्वतःसाठी काहीतरी वेगळा आणि हटके जॉब शोधत असाल तर ब्रिटनमधील (Britain) एक कंपनी तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकते. ही कंपनी चिकन डीपर्स (Chicken Deeper) बनवते. हे एक प्रकारचे फ्राईड चिकन नगेट्सच असतात. कंपनी आपल्या या प्रोडक्टची चव सर्वोत्तम करूनच मार्केटमध्ये उतरू इच्छिते. यासाठी ते हे प्रोडक्ट टेस्ट करणाऱ्या टेस्टरच्या (Product Tester Job) शोधात आहेत. चिमुकल्या लेकीच्या खतरनाक हौशेमुळे आई दहशतीत; तिची खेळणी पाहूनही फुटतो घाम यूकेची प्रसिद्ध फिश फिंगर कंपनी BirdsEye मध्ये सध्या टेस्ट टेस्टरसाठी जागा (Product Tester Vacancy in UK) आहेत. हे लोक अशा व्यक्तीला शोधत आहेत, जो चिकन डीपर्सची परफेक्ट टेस्ट निवडू शकेल. कंपनीची अशी इच्छा आहे की त्यांचे चिकन डीपर्स सर्वात चांगले असावेत. यामुळे ते रिस्क घेऊ शकत नाहीत. कंपनीनं या जॉबचे डिटेल्सही शेअर केले आहेत. यासाठी कंपनी एक लाख रुपये सॅलरी देईल. जो व्यक्ती हा जॉब मिळवेल, त्याला चीफ डिप्पिंग ऑफिसरची पोस्ट दिली जाईल. हा जॉब मिळवण्यासाठी व्यक्तीमध्ये टेस्ट ओळखण्याची अद्भुत क्षमता असायला हवी. त्याला डीपर्सचं क्रिस्प, त्याची गोडी आणि सॉसचा परफेक्ट बॅलन्स माहिती पाहिजे. हा जॉब तेव्हा दिला जात आहे जेव्हा ब्रिटनमध्ये बेरोजगारी आणि महागाई दोन्ही शिखरावर आहे. कंपनी या डीपर्ससोबत परफेक्ट सॉसही आणणार आहे. नुकतंच यूकेमध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये काही लोकांनी चिकन डीपर्ससोबत टोमॅटो सॉस बेस्ट असल्याचं म्हटलं होतं, तर काहींनी मायोनीज सॉस बेस्ट असल्याचं म्हटलेलं. VIDEO - तिला ऐकू येत होता विचित्र आवाज आणि तीव्र खाज; कानात पाहताच डॉक्टरही शॉक तुम्हाला जर वाटत असेल की या जॉबसाठी तुम्ही परफेक्ट आहात तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही birdseyeHR@chiefdippingofficer.co.uk वर एक 250 शब्दांचं लेटर पाठवून आणि हा जॉब तुम्हाला हा ज़ॉब का दिला जावा? हे सांगू शकता. जर तुमचं उत्तर कंपनीला आवडलं तर हा ड्रीम जॉब तुम्हाला मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या