नवी दिल्ली, 17 मार्च : अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात महिनाभरापूर्वी दोन भाऊ हरवले होते. आता त्यांचा शोध लागला आहे. ही घटना ब्राझीलच्या मॅनिकोर येथील आहे. 18 फेब्रुवारीला हे दोन्ही भाऊ पक्ष्यांच्या शिकारीसाठी घराबाहेर पडले होते. हे दोन्ही भाऊ पामैरा जमातीतील आहेत. मोठा भाऊ 8 वर्षांचा असून त्याचं नाव ग्लेसन कार्व्हालो रिबेरो आहे. ग्लेको कार्व्हालो रिबेरो असं त्याच्या 6 वर्षांच्या लहान भावाचं नाव आहे. हे दोघेही जवळपास एक महिन्यापासून (27 दिवसांपर्यंत) बेपत्ता होते. 15 मार्चला अॅमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये लाकूड तोडणाऱ्या एका व्यक्तीनं या दोन भावांना पाहिलं.
तेथून दोघांना बोटीतून स्थानिक टाऊन हॉलमध्ये नेण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षा सचिवालयानुसार, त्यांना आता विमानानं राज्याची राजधानी मानौस इथं नेण्यात येईल. दोन्ही भावांचे फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूपच हडकुळे आणि अशक्त दिसत आहेत. या दोघा भावांच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञांनी मॅनिकोरच्या डॉक्टरांना आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनाही दिल्या. हे वाचा - Russia Ukraine War:एकीकडे युद्धाच्या झळा तर दुसरीकडे चिनी तरुणांना भलतीच लगीनघाई यापूर्वी स्थानिक अग्निशमन आणि पोलीस विभागानं या मुलांचा शोध घेणं थांबवलं होतं. मात्र, पामैरा जमातीच्या लोकांनी त्यांचा शोध सुरूच ठेवला. ब्राझीलच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, हरवलेल्या मुलांच्या प्रकरणात एका व्यक्तीची चौकशी सुरू आहे. मात्र, ‘ते दोघे हरवले होते’ यापलीकडे दुसरी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती. हे वाचा - कधीही Lockdown न लागलेल्या ‘या’ देशात Corona चा तांडव, एका दिवसात 6 लाख रुग्ण गेल्या वर्षी या जमातींसाठी राखीव असलेल्या अॅमेझॉन रेन फॉरेस्टमधील जमीन धोक्यात आली होती. मग लोकांनी या भागातील जमीन फेसबुकवर विक्रीसाठी टाकली. हा जंगलाचा राखीव भाग तब्बल 1000 फुटबॉल मैदानांइतका मोठा आहे. हे सोशल नेटवर्कच्या वर्गीकृत जाहिरात सेवेमध्ये ठेवले होते. या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय वन आणि आदिवासींसाठी राखीव जमीन समाविष्ट आहे. मात्र, नंतर फेसबुकने जमीन बेकायदेशीर ठरवून तिच्या विक्रीवर बंदी घातली.