Home /News /videsh /

Russia Ukraine War: एकीकडे युद्धाच्या झळा तर दुसरीकडे चिनी तरुणांना भलतीच लगीनघाई, काय आहे प्रकरण?

Russia Ukraine War: एकीकडे युद्धाच्या झळा तर दुसरीकडे चिनी तरुणांना भलतीच लगीनघाई, काय आहे प्रकरण?

ukrainian marriage

ukrainian marriage

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे संपुर्ण जग चिंतेत असताना चिनी लोकांच मात्र काही वेगळचं सुरु आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 मार्च: रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे संपुर्ण जग चिंतेत असताना चिनी लोकांच मात्र काही वेगळचं सुरु आहे. चीनच्या पुरुषांनी लग्नासाठी युक्रेनियन वधू शोधण्यास सुरुवात केली आहे. डेटिंग सर्व्हिस मेलिष्का मॅच मेकिंग सर्व्हिसनुसार, यावेळी युक्रेनियन वधूंमध्ये चिनी पुरुषांची आवड (Chinese men want Ukrainian Bride) दुप्पट झाली आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये सगळं उद्ध्वस्त झालं आहे. लाखो लोकांनी स्थलांतर केल आहे. अशा परिस्थितीत, ज्या मुलींना युक्रेनमध्ये त्यांचे भविष्य दिसत नाही किंवा त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते अशा मुलींसाठी चिनी मुलांनी एक अजब युक्ती लढवली आहे. संकटात असलेल्या मुलींना आधार देण्यासाठी चिनी तरुणांनी त्या मुलींसमो लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. वाइसच्या रिपोर्टनुसार, युद्धादरम्यान, चीनचे तरुण पहिल्या दिवशी सुमारे 5 युक्रेनियन मुलींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवायचे. मात्र आता यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. मेलिश्का मॅच मेकिंग सर्व्हिसचे रशियन मालक पावेल स्टेपनेट्स म्हणाले - 'चीनी मुलांना माहित आहे की युक्रेनियन मुली यावेळी दुःखी असतील आणि ते स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधत आहेत. अशा परिस्थितीत, युक्रेनियन मुली चिनी पतींना एक चांगला पर्याय मानतील. मिलिश्काच्या माहितीनुसार, 748 युक्रेनियन मुली चिनी मुले शोधत आहेत, तर 70 चिनी मुले वधू शोधत आहेत. 8-9 मॅचमेकिंग देखील केले आहे. चिनी पुरुषांना परदेशी वधू हव्या असतात मॅच मेकिंग सर्व्हिस किंवा 'मेल ऑर्डर ब्राइड' ही चीनमध्ये लोकप्रिय संकल्पना आहे. तेथील लोकसंख्या नियंत्रण धोरणामुळे मुलींचे मुलांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. एक मूल होण्याच्या धोरणात लोकांनी मुलांची निवड केली, त्यामुळे गेल्या 35 वर्षांत मुलींची संख्या खूप कमी झाली आहे. यामुळेच चिनी पुरुष स्वत:साठी परदेशी वधू शोधत राहतात. त्यांचे प्राधान्य पूर्व युरोपातील मुलींना आहे. चीन आणि युक्रेनमध्ये मॅचमेकिंग काही नवीन नाही, परंतु युद्धाच्या काळात ही संख्या वेगाने वाढली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marriage, Russia Ukraine

    पुढील बातम्या