JOIN US
मराठी बातम्या / विदेश / टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी 2 दिवसांपासून बेपत्ता; प्रत्येकी 2 कोटी तिकीट, 5 पर्यटकांपैकी एक अरबपती

टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी 2 दिवसांपासून बेपत्ता; प्रत्येकी 2 कोटी तिकीट, 5 पर्यटकांपैकी एक अरबपती

या पर्यटनासाठी प्रत्येकी 2 कोटी तिकीट आकारण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जून : टायटॅनिक ज्या ठिकाणी बुडाली तेथील ठिकाणी पर्यटकांना घेऊन गेलेली पानबुडी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. रविवारी या पाणबुडीशी संपर्क तुटला होता. तेव्हापासून याचा शोध सुरू आहे. युएसच्या कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात उतरल्याच्या दीड तासातच पाणबुडीशी संपर्क तुटला होता. ओशियनगेटच्या या छोट्याशा पानबुडीत पाच पर्यटक आहेत. या पाणबुडीचा शोध सुरू आहे. पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाचे जहाज आणि विमानं पाठवण्यात आली आहेत. टायटॅनिकचं जहाज पाहण्याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे पर्यटन साधारण 8 दिवसांचं आहे. या 8 दिवसाच्या पर्यटन यात्रेचं तिकीट तब्बल अडीच लाख डॉलर म्हणजे 2 कोटी इतकं आहे. ही पाणबुडी समुद्रात 3800 मीटर खोलात जिथं टायटॅनिकचं जर्जर झालेलं जहाज आहे. तिथपर्यंत घेऊन जाते. आणि अख्ख्या जगाला हादरवणाऱ्या अपघाताचं जर्जर रूप पाहायला मिळतं. तब्बल पाच जणं पाणबुडीतून टायटॅनिक पाहण्यासाठी निघाले होते. सोमवारी दुपारी अमेरिकेचे कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडी शोधण्यासाठी त्यांच्याकडे 70 ते 96 तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यांच्याकडील ऑक्सिजन पुढील काही दिवस चालेल. ब्रिटनचे अरबपती हामिश हार्डिंग देखील या पाणबुडीत आहेत. 58 वर्षीय हार्डिंग एक एक्सप्लोररदेखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या पर्यटनाबाबतची माहिती दिली होती. Greece Boat News : काल 100 आज 79 जणांचा मृत्यू, 500 प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडालं का पाहायचंय टायटॅनिकचं जर्जर जहाज? जगातील सर्वात मोठं प्रवासी जहाज टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी पहिल्यादा प्रवासाला निघालं होतं. जो दुर्देवाने शेवटचा प्रवास ठरला. ब्रिटनच्या साऊथहॅप्टनपासून सुरू झालेला प्रवास अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये पूर्ण होणार होता. 4 दिवसांनंतर 14-15 एप्रिल रोजी जहाज एका बर्फाला धडकलं अटलांटिक महासागरात बुडालं. जहाजमधून प्रवास करणारे 2200 प्रवासी-क्रू पैकी 1500 हून अधिक मृत्यू झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या