JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तालिबानने TikTok आणि PUBG वर घातली बंदी, या खेळांमुळे तरुणांची दिशाभूल होतेय

तालिबानने TikTok आणि PUBG वर घातली बंदी, या खेळांमुळे तरुणांची दिशाभूल होतेय

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारने (Taliban Government) व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (TikTok) आणि सर्वाइवल-शूटर प्लेयर यूएनडॉग्स बैटलग्राउंड (PUBG) या खेळावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 22 एप्रिल : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारने (Taliban Government) व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (TikTok) आणि सर्वाइवल-शूटर प्लेयर यूएनडॉग्स बैटलग्राउंड (PUBG) या खेळावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानातील तरुणांची दिशाभूल या खेळांमुळे होत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. मागच्या वर्षी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर सत्ता स्थापन केली. यानतंर तिथे संगीत, चित्रपट आणि सीरिअल्सवर प्रतिंबध लावण्यात आला आहे. आता टिकटॉक आणि पबजी यावर प्रतिबंध लावण्यात आल्यामुळे तेथील लोकांच्या मनोरंजनाची साधने कमी झाली आहे. टीव्ही चॅनेल्सबाबतही सूचना - तालिबान कॅबिनेटने म्हटले आहे की, या अॅप्सने तरुण पिढीची दिशाभूल केली. यामुळेन त्यांना बंद करण्याचे आदेश दूरसंचार मंत्रालयाला देण्यात आले आहेत. टीव्ही चॅनेल्सना ‘अनैतिक कार्यक्रम’ दाखवण्यापासून रोखण्याचे निर्देशही मंत्रालयाला देण्यात आले होते. मात्र, वाहिन्यांवर बातम्या आणि धार्मिक कार्यक्रमा पलीकडे फार कमी प्रसारित केले जात आहे. ऑगस्टमध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने दावा केला की ते पूर्वीच्या राजवटीच्या (1996 ते 2001) पेक्षा इस्लामिक राजवटीची नरमाईची भूमिका घेतील. तथापि, हळूहळू तालिबानने सामाजिक जीवनावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. हळूहळू महिलांवरही बंधने लादण्यात आली. मुलींसाठी बहुतांश माध्यमिक शाळा बंद आहेत. तर महिलांना अनेक सरकारी नोकऱ्या आणि परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. महिलांना वरिष्ठ किंवा पुरुष नातेवाईकासोबत असल्याशिवाय अफगाण शहरांमध्ये प्रवास करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. हेही वाचा -  PM Modi यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद तर 4 दहशतवाद्यांचा खात्मा 9 दशलक्ष लोक करत आहेत इंटरनेटचा वापर - डेटारिपोर्टल या स्वतंत्र डेटा संग्राहकाने जानेवारीमध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये फक्त 9 दशलक्ष लोकांकडे इंटरनेटचा प्रवेश आहे तर देशाची लोकसंख्या 38 दशलक्ष आहे. सुमारे 4 दशलक्ष सोशल मीडिया वापरकर्ते आहेत, ज्यामध्ये फेसबुक सर्वात लोकप्रिय आहे. अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या मागील सरकारनेही PUBG वर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. कथित “अश्लील” सामग्रीसाठी चिनी मालकीच्या टिकटॉकला शेजारच्या पाकिस्तानमध्ये यापूर्वी दोनदा बंद केले गेले आहे. पूर्वीच्या राजवटीत, तालिबानच्या धार्मिक पोलिसांनी पतंग उडवणे आणि कबुतरांच्या शर्यतीसारख्या मनोरंजक गोष्टींवर बंदी घातली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या