JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाला रोखण्यासाठी 'या' देशाचा हायटेक प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTV

कोरोनाला रोखण्यासाठी 'या' देशाचा हायटेक प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTV

संक्रमित व्यक्तीची ओळख पटविणे किंवा लॉक डाऊनसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 30 मार्च : कोरोनाव्हायरससोबत सुरू असलेल्या युध्दात जगातील अनेक बड्या देशांनी उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काही देशांमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. संक्रमित व्यक्तीची ओळख पटविणे किंवा लॉक डाऊनसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. रशियाने तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत घेतली आहे. यासाठी मॉस्को शहरात 1 लाख 70 हजाराहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या हायटेक कॅमेराच्या मदतीने व्यक्तीची संपूर्ण माहितीही मिळू शकते. एवढेच नाही तर, त्याचा प्रवास इतिहास, वैद्यकीय इतिहास, सर्व काही रेकॉर्डची माहिती मिळेल.या माध्यमातून संशयित संशयितांची तातडीने ओळख पटविली जात आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाउनचे उल्लंघन करणारेसुद्धा यातून सहज पकडले जात आहेत. रशियामध्ये आतापर्यंत 1 हजार 534 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील केवळ 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढून नये यासाठी रशियामध्ये जगातील सर्व हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाचा- पाकचे नापाक काम, कोरोनाच्या आपत्तीत हिंदूना नाकारले रेशन सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार,  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी नुकतीच इंटरनेटद्वारे अनेक तंत्रज्ञान चालवण्यास मान्यता दिली होती. आता कोरोनाव्हायरस विरूद्ध युद्धात सरकारने त्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. या अडचणीच्या वेळी सरकार तंत्रज्ञानाच्या शक्तीचीही तपासणी करत आहे. प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, यामध्ये लोकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. मॉस्कोमध्ये फेशियल रिकग्निशन सिस्टम स्थापित करण्यात आली आहे. वाचा- ‘कोरोनामुळे 1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी’, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ आतापर्यंत या कॅमेरेच्या मदतीने लॉक डाऊनचे नियम मोडणाऱ्या 200 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे तर, मोबाईलनेही लोकांना ट्रॅक केले जात आहे. अशा सर्व लोकांना शोधून काढताच मोबाईलवर मेसेज पाठवून सतर्क राहण्यास आणि अलग ठेवण्यास सांगितले जाते. याच्या मदतीने बीजिंग येथून आलेल्या चिनी महिलेलाही अटक करण्यात आली. त्यामुळं रशियामध्ये संक्रमित रुग्णांची संख्या इतर बड्या देशांच्या तुलनेत कमी आहे. वाचा- कोरोनाला हरवण्यासाठी हायस्पीड ट्रेन झाली अ‍ॅम्बुलन्स, 300KM वेगाने रुग्ण पोहचणार रुग्णालयात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या