फिलिपीन्स, 30 मार्च : दक्षिण फिलिपीन्समध्ये तब्बल 250 प्रवासी आणि सहकर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. जहाजाला आग लागल्यानंतर तब्बल 31 जणं बुडाले. तर काही जणं होरपळले. राज्यपालांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. जहाजाला आग लागल्यानंतर प्रवासी घाबरले आणि अनेकांनी समुद्रात उडी घेतली. यानंतर नौसेना अन्य बोटीवरील प्रवाशी, मासेमारी करणाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. अद्यापही अनेक प्रवाशी बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. जळाल्यानंतर जहाजाला बसिलनच्या तटापर्यंत नेण्यात आलं. येथे सुरक्षा कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांसह प्रवाशांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या जहाजातून तब्बल 250 जणं प्रवास करीत होते. त्यापैकी 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 18 जणांचा शोध सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.