JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मोठा घातपात करण्याच्या तयारीत किम जोंग? सॅटेलाइट PHOTOने जगभरात खळबळ

मोठा घातपात करण्याच्या तयारीत किम जोंग? सॅटेलाइट PHOTOने जगभरात खळबळ

उत्तर कोरियाचे काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये लष्करी परेड होत असल्याचे दिसत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्याँगयांग, 18 सप्टेंबर : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन (Kim jong Un) नेहमीच विचित्र फर्मान काढत असतात. दक्षिण कोरियाच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, अमेरिकेबरोबर दीर्घकाळ चाललेल्या अणु-चर्चेच्या दरम्यान उत्तर कोरिया समुद्राच्या आतून बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी करू शकतात. यातच आता उत्तर कोरियाचे काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये लष्करी परेड होत असल्याचे दिसत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर उत्तर कोरिया पुढील महिन्यात त्याच्या सत्ताधारी पक्षाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राजधानीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त लष्करी परेडची तयारी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र किम यांनी याआधी अशीच माहिती देत कठोर निर्णयही घेतले होते. वाचा- NASA च्या कॅमेऱ्यात चित्रित झालं मंगळावरचं ‘भूत’? रोव्हरने टिपलेला VIDEO पाहा कोलोरॅडो येथील एका मॅक्सर नावाच्या सॅटेलाइनमधून हा फोटो टिपण्यात आला आहे. यात प्योंगयांगच्या किम इल सुंग स्क्वेअरजवळ हजारो लाखो जमलेले दिसत आहेत. दरम्यान, हा वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. सत्ताधारी कामगार पक्षाच्या स्थापनेचा वर्धापनदिन 10 ऑक्टोबर रोजी आहे. वाचा- चीनला धडा शिकवण्यासाठी भारत- जपान एकत्र; काय आहे India- Japan Military Pact

संबंधित बातम्या

वाचा- मास्क न घालणाऱ्यांना अशी शिक्षा, खोदावी लागणार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची कबर शाळेत मुलं फक्त वाचणार किम जोंग यांची माहिती उत्तर कोरियाने शाळांमध्ये एक मोठा बदल केला आहे. नव्या आदेशानुसार मुलं आपल्या अर्ध्या अभ्यासक्रमात केवळ किम जोंग उन यांच्याबाबत वाचतील. प्री-स्कूलच्या नवीन अभ्यासक्रमात ग्रेटनेस एज्यूकेशनची भर घातली गेली आहे ज्यामध्ये किम जोंग उन आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती असणार आहे. प्री-स्कूलमध्ये तीन तासांचा अभ्यास केला जाईल, त्यापैकी केवळ किम जोंग उनला यांच्याबाबत सांगितले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या