JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जेलेन्स्की यांचे निर्वाणीचे बोल, रशियन आम्हाला मारू शकतील; पण ते स्वतःही वाचणार नाहीत

जेलेन्स्की यांचे निर्वाणीचे बोल, रशियन आम्हाला मारू शकतील; पण ते स्वतःही वाचणार नाहीत

अलीकडच्या काही दिवसांपासून युक्रेनची राजधानी कीव आणि देशाच्या उत्तर आणि मध्य भागाला वेढा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याने येथून आपलं सैन्य मागे घेतलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कीव, 17 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 52 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धात दोन्ही देशांचं नुकसान आणि विध्वंस होत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी युरोपीय देश रशियाकडून तेल विकत घेत असल्याचा आरोप करत “ते इतरांच्या रक्तातून पैसे कमवत आहेत,” असं म्हटलं आहे. अध्यक्ष जेलेन्स्की यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मारियुपोलमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असावा. आमच्याकडे अशी माहिती आहे की, हजारो लोक मरण पावले आहेत आणि बरेच लोक बेपत्ता झाले आहेत. आम्हाला माहीत आहे की, त्यांची कागदपत्रं बदलली गेली आहेत. त्यांना रशियन पासपोर्ट देण्यात आले आहेत आणि रशियामध्ये कुठेतरी नेलं गेलं आहे.” ते म्हणाले, “काही लोकांना तेथील मदत शिबिरांमध्ये नेण्यात आलं आहे. तर, काहींना इतर शहरांमध्ये नेण्यात आलं आहे. त्यांचं काय होत आहे, हे कोणालाच कळत नाही. आतापर्यंत किती लोक मरण पावले हे कोणालाच माहीत नाही.” हे वाचा -  पतीला युक्रेनी महिलांवर बलात्कार करायला सांगणारी कोण आहे रशियन महिला? बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जेलेन्स्की यांनी जर्मनी आणि हंगेरीवर निशाणा साधला. त्यांच्यामुळे रशियातून तेल खरेदी करण्यावर घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. जेलेन्स्की म्हणाले की, या निर्यातीमुळे रशियाला या वर्षी $326 अब्जपर्यंत फायदा होऊ शकतो. गुरुवारी, जेलेन्स्की कीवमधील म्हणाले, “आमच्या काही सहकारी आणि मित्रांना हे समजलं आहे की, आता वेळ पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती आता व्यवसाय किंवा पैशाची बाब नाही. आता हा जगण्याचा संघर्ष आहे. राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय देशांना युक्रेनला अधिक शस्त्रं देण्याचं आवाहन केलं आणि रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांना लवकरच आणखी शस्त्रास्त्रांची गरज असल्याचं सांगितलं. हे वाचा -  Video: विधानसभेत राडा; उपसभापतींच्या लगावली कानशिलात, केसही ओढले ते म्हणाले, “अमेरिका, ब्रिटन आणि काही युरोपीय देश आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तेही मदत करत आहेत. पण आम्हाला लवकरात लवकर आणखी मदत हवी आहे.” अलीकडच्या काही दिवसांपासून युक्रेनची राजधानी कीव आणि देशाच्या उत्तर आणि मध्य भागाला वेढा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याने येथून आपलं सैन्य मागे घेतलं आहे. संपूर्ण युक्रेन बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न रशियन सैन्याने सोडून दिल्याचं सांगितलं जात आहे. शांततेसाठी चर्चेची शक्यता आणखी कमी युक्रेनचे दक्षिणेकडील मारियुपोल शहर रशियन सैन्याने वारंवार केलेल्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी हे शहर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या