Home /News /videsh /

Watch Video: विधानसभेत गदारोळ; नेत्यांनी उपसभापतींच्या लगावली कानशिलात, केसही ओढले

Watch Video: विधानसभेत गदारोळ; नेत्यांनी उपसभापतींच्या लगावली कानशिलात, केसही ओढले

राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावलं असताना हा गदारोळ झाला. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, विधानसभेत उपसभापती (Deputy Speaker) दोस्त मुहम्मद मजारी यांच्यावर लोटा फेकण्यात आले.

    इस्लामाबाद, 16 एप्रिल: पाकिस्तानातील सर्वात मोठे राज्य असलेल्या पंजाब विधानसभेत (Punjab Legislative Assembly) जोरदार गदारोळ झाला. राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावलं असताना हा गदारोळ झाला. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, विधानसभेत उपसभापती (Deputy Speaker) दोस्त मुहम्मद मजारी यांच्यावर लोटा फेकण्यात आले. संतप्त झालेल्या पीटीआय सदस्यांनी त्यांना कानशिलातही मारली. त्यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोस्त यांना सुरक्षेच्या परिसरात घेऊन बाहेर गेले. पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत शनिवारी इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या नेत्यांनी हद्द पार केली. विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआय नेत्याने वेलवर हल्ला केला आणि उपसभापती मोहम्मद माजरी यांना चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर पीटीआयचे नेते सोबत लोटा घेऊन आले होते. त्यांनी आधी लोटा फेकून मारला आणि हे करुनही त्यांचे समाधान न झाल्यानं त्यांनी वेलवर येऊन उपसभापतींचे केस ओढून कानशिलात लगावली. पंजाबचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी उपसभापती दोस्त मोहम्मद माजरी सभागृहाच्या अध्यक्षस्थानी आले असता इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या आमदारांनी त्यांना मारहाण केली. लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंजाबसाठी नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. त्यासाठी शनिवारी अधिवेशन बोलावण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पीटीआयच्या आमदारांनी त्यांच्यावर लोटा फेकला. यावेळी सुरक्षा रक्षकही तेथे उपस्थित होते. पंजाब विधानसभेचे अधिवेशन सकाळी 11.30 वाजता सुरू होणार होते, मात्र पीटीआय सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे ते तहकूब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशन सुरू होताच अगोदर बसलेल्या पीटीआय नेत्यांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नॅशनल असेंब्लीतील अविश्वास ठरावासाठी पीटीआयमधून बाहेर पडलेल्या विरोधी छावणीतील नेत्यांवर हल्लाबोल करत पीटीआयच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. उपसभापतींनी पीटीआय नेत्यांना तसे करण्यापासून रोखले असता त्यांनी उपसभापती माजरी यांच्यावर लोटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वेलमध्ये येऊन उपसभापतींना मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत किशोर लवकरच 'या' पक्षाची हातमिळवणी करणार?, हायकमांडच्या बैठकीला हजेरी पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीटीआय नेत्यांनी माजरी यांच्यावर कानशिलात लगावण्याचा वर्षाव सुरू केला. त्यांचे केसही ओढले. यावेळी सिव्हिल वेशभूषेत विधानसभेत उपस्थित असलेल्या पोलिसांनी पुढाकार घेत उपसभापतींना कसेबसे सोडवून विधानसभेच्या इमारतीबाहेर आणले. काही वेळाने अधिवेशन सुरू झाल्यावर पीटीआयचे नेते सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यानंतर कोणताही निर्णय न घेता अधिवेशन आजसाठी तहकूब करावे लागले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या