JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Ukraine Crisis : रशियानं 'मोस्कवा'च्या विनाशाचा घेतला बदला, नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मितीचा प्लँटच उडवला

Ukraine Crisis : रशियानं 'मोस्कवा'च्या विनाशाचा घेतला बदला, नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मितीचा प्लँटच उडवला

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 51 दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. जमिनीवर मोठ्या प्रमाणात विध्वंसाचं दृश्य पाहायला मिळत आहे. हे युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चाललं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध (russia ukraine war) सुरू आहे. युक्रेनने रशियन युद्धनौका मोस्कवा (Moskva) नष्ट केल्यावर युद्धाला एक मोठं वळण लागलं. आता रशियाच्या बाजूनं याला प्रत्युत्तर देण्यात आलंय. रशियन सैन्यानं कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला (keive missile attack) केल्याचं सांगण्यात आलं. इथला नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पच उडवण्यात आला आहे. आता रशियाने निश्चित रणनीती अंतर्गत नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाला लक्ष्य केलं आहे. युक्रेनकडून या क्षेपणास्त्रानं रशियन युद्धनौका उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. अशा स्थितीत युक्रेन भविष्यात पुन्हा हल्ला करू शकत नाही, त्यामुळे थेट ही क्षेपणास्त्रं तयार करणारा प्लांट उडवण्यात आला आहे. हे वाचा -  रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिलांसोबत सैतानी कृत्य, अत्याचारांबद्दल वाचलं तरी होईल थरकाप

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 51 दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. जमिनीवर मोठ्या प्रमाणात विध्वंसाचं दृश्य पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण फारसं यश आलं नाही. ना रशिया हार मानायला तयार आहे, ना युक्रेन आत्मसमर्पण करायला तयार आहे. अशा परिस्थितीत हे युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चाललं आहे.

युक्रेनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रशियन युद्धनौकेसह त्यात उपस्थित असलेल्या त्यांच्या कमांडरलाही ठार मारलंय. रशियानं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, युक्रेनच्या मीडियामध्ये ही बातमी सातत्याने चालवली जात आहे. युक्रेनसाठी हे मोठे यश असल्याचे वर्णन केले जात आहे. तशाच प्रकारे, रशियाकडूनही दावा करण्यात आला आहे की, या युद्धात युक्रेनच्या एक हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केलं आहे. हे वाचा -  Russia-Ukraine युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम? याशिवाय रशियानं युक्रेनवर गंभीर आरोपही केले आहेत. युक्रेनकडून रशियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात दोन इमारतींचेही मोठे नुकसान झाले असून अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे, असं रशियानं म्हटलंय. या हल्ल्यावर युक्रेनकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की त्यांनी अशी कोणतीही कारवाई केली नाही आणि रशियाकडून साफ खोटं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या