पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना दिल्या १० भेटवस्तू
वॉशिंग्टन, 22 जून : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जील बायडन यांनी पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाउसमध्ये बुधवारी रात्री (21 जून) मेजवानी (डिनर) आयोजित केली होती. या डिनरमध्ये राष्ट्रपतींच्या आवडत्या खाद्यपदार्थांचाही (पास्ता आणि आईस्क्रीम) समावेश होता. या मेजवानीमध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झेक सुलिव्हन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्री मोदींनी बायडन दाम्पत्याला खास भारतीय वस्तू भेट म्हणून दिल्या. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन यांना प्रयोगशाळेत तयार केलेला 7.5 कॅरेटचा एक हिरवा हीरा भेट दिला आहे. हा हीरा जमिनीतून मिळालेल्या हिऱ्यांप्रमाणेच रासायनिक आणि ऑप्टिकल गुणधर्म दाखवतो. हा हिरा ईको-फ्रेंडलीदेखील आहे. कारण, त्याच्या निर्मितीमध्ये सौर आणि पवन उर्जेसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर केला गेला आहे. मोदींना भारताची काळजी, मी त्यांचा फॅन; भेटीनंतर एलॉन मस्कची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिलेल्या भेटवस्तू: - राजस्थानातील जयपूर येथील एका कुशल कारागिरानं बायडन यांना देण्यासाठी एक खास चंदनाची छोटी पेटी तयार केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूरमधून आणलेल्या चंदनावर वनस्पती आणि प्राण्यांची बारीक नक्षी कोरून ही पेटी तयार करण्यात आली आहे. राजस्थानमधील चंदनावरील कोरीवकाम ही भारतातील एक प्राचीन कला आहे. या पेटीमध्ये गणपतीची चांदीची एक मूर्ती आहे. ही मूर्ती कोलकत्त्यातील एका सोनार कुटुंबानं तयार केलेली आहे. या कुटुंबाच्या पाच पिढ्या याच व्यवसायात आहे. - कापसाची वात तेलात बुडवून लावलेल्या दिव्याला प्रत्येक हिंदू घरामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. असाच एक चांदीचा दिवा जो बायडन यांना भेट देण्यात आला आहे. हा दिव्यावरदेखील कोलकत्त्यातील सोनार कुटुंबानं कलाकुसर केलेली आहे. - मोदींनी बायडन यांना, उत्तर प्रदेशातून आणलेली तांब्याची प्लेट म्हणजेच ताम्रपत्र भेट दिला आहे. त्यावर एक श्लोक कोरलेला आहे. प्राचीन काळी ताम्रपत्र हे लेखन आणि रेकॉर्ड ठेवण्याचं माध्यम म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं. - पीएम मोदींनी 10 भेटवस्तू असलेला आणखी एक बॉक्स अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांना दिला आहे. दानाचं प्रतीक म्हणून या 10 वस्तूंचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बेपत्ता पाणबुडीत अवघ्या 8 तासांचा ऑक्सिजन शिल्लक, युद्धपातळीवर शोधमोहिम - गोदानासाठी, गायीच्याऐवजी पश्चिम बंगालमधील कुशल कारागिरांनी हातानं तयार केलेला चांदीचा नारळ बायडन यांना देण्यात आला. - भूदानासाठी, जमिनीऐवजी कर्नाटकातील म्हैसूर येथून चंदनाचा एक सुगंधित तुकडा देण्यात आला. - तमिळनाडूतील तीळ बायडन यांना देण्यात आले. - हिरण्यदान (सोन्याचं दान) म्हणून, राजस्थानमध्ये हस्तकला केलेला 24 कॅरेट शुद्ध आणि हॉलमार्क असलेलं सोन्याचं नाणं भेट देण्यात आलं. - महाराष्ट्रामध्ये तयार झालेला गूळ जो बायडन यांना भेट देण्यात आला. - राजस्थानमधील कारागिरांनी कलाकुसर केलेलं शुद्ध चांदीचं (99.5%) नाणं भेट देण्यात आलं. - गुजरातमधील लवण म्हणजेच मीठ जो बायडन यांना भेट देण्यात आलं. - पंतप्रधान मोदींनी लंडनमधील फॅबर आणि फॅबर लिमिटेडनं प्रकाशित केलेल्या आणि युनिव्हर्सिटी प्रेस ग्लासगो येथे छापलेल्या ‘द टेन प्रिन्सिपल उपनिषद’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची प्रत जो बायडन यांना भेट दिली. व्हाईट हाउसनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची अधिकृत भेट म्हणून राष्ट्रपती जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पंतप्रधान मोदींना 20 व्या शतकाच्या सुरुवातीला तयार केलेली एक हस्तनिर्मित, प्राचीन अमेरिकन बुक गॅली भेट दिली आहे. या शिवाय, त्यांनी व्हिंटेज अमेरिकन कॅमेरा, जॉर्ज ईस्टमन यांच्या पहिल्या कोडॅक कॅमेऱ्याचे पेटंट आणि अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफीचं एक हार्डकव्हर पुस्तकदेखील मोदींना भेट दिलं आहे.