इस्लामाबाद, 13 एप्रिल : कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानपुढे कोरोनाव्हायरसमुळे नवीन आव्हान आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरानन खान यांनी पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन, केले आहे. दरम्यान इमरान खान यांचे हे आवाहन कोरोनाचे कारण पुढे करत कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जात आहे. ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये इमरान यांनी जगातील वित्तीय संस्थांना पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी मोहीम राबवावी असे आवाहन केले. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ केले जावे, अशी मागणी इमरान यांनी केली. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानसारखा कर्जबाजारी देश कोरोनाची सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा देशांना मदत करण्यासाठी एक मोहीम सुरू करावी, अशी मागणीही यावेळी केली. वाचा- ‘तुम्ही महिला असाल तर…’, सर्वांसमोरच घातली पुणे पोलिसांना लग्नाची मागणी पाकिस्तानमधील उपासमारीची परिस्थिती काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या SARC कोव्हिड-19 फंडातून कोरोनाविरूद्ध लढण्याच्या नावाखाली पाकिस्तानने पैशांची मागणी केली होती. आता इमरान खान यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की जर पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनापेक्षा जास्त लोक उपासमारीने मरणार आहेत. इमरान यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना विकसित देशांना मदत करण्याची विनंती केली जेणेकरुन ते कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर मात करू शकतील. वाचा- धारावीत कोरोनाचा कहर! गेल्या 12 तासात 4 नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
वाचा- खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, ‘या’ देशाने केला दावा व्हिडीओद्वारे मागितली मदत इमरान यांनी व्हिडीओ पोस्ट करत, “मी आज जागतिक समुदायाला सांगत आहे की कोव्हिड -19 विरुद्धच्या लढाईत दोन धोरणे अवलंबली जात आहेत. विकसित देश प्रथम कोरोनाविरूद्ध लॉकडाऊन करून लढा देत आहेत आणि या लॉकडाऊनमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीकरिता अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. मात्र पाकिस्तानसारख्या विकसनशील देशांना हे सर्व करता येत नाही आणि येथे लॉकडाऊनमुळे आता उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाचा- अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण… ‘उपासमारीपासून लोकांना वाचवा’ इमरान यांनी या व्हिडीओ असे म्हटले आहे की, लोकांना कोरोनापासून स्वत: ला वाचवायचे आहे पण लॉकडाऊनमुळे उपासमारीच्या परिस्थितीपासून स्वत: चे संरक्षणही करावे लागेल हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. जागतिक समुदायाने लोकांना उपासमारीपासून वाचविणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, विकसनशील देशांना भेडसावणारी इतर समस्या म्हणजे विकसनशील आणि विकसित देशांकडे असलेल्या स्त्रोतांमध्ये खूप असमानता आहे. सध्या कर्जात डुबलेल्या पाकिस्तानमध्ये 5 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे.