नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) भाऊ इब्राहिम बिन लादेनची (Ibrahim Bin Laden) हवेली आता विकली जाणार आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात वसलेली ही आलिशान हवेली गेल्या 20 वर्षांपासून रिकामी पडून होती. या हवेलीचा लिलाव होणार असल्याची बातमी समोर येताच अनेकांना या हवेलीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच संबंधित आलिशान हवेलीची किंमत किती असेल याबाबतही सोशल मीडियावर गप्प रंगल्या आहेत. ही हवेली तब्बल सुमारे 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकली जाणार आहे. खरंत लॉस एंजेलिस हे अमेरिकेचं सर्वात महागड्या शहरापैकी एक शहर आहे. ओसामा बिन लादेनचा भाऊ इब्राहिम बिन लादेन यानं ही हवेली 1983 खरेदी केली होती. त्यावेळी लादेन बंधूने या आलिशान हवेलीसाठी सुमारे 20 लाख डॉलर्स म्हणजेच 1.48 कोटी रुपये मोजले होते. पण मागील 20 वर्षांपासून ही हवेली रिकामी पडून होती. याठिकाणी कोणीही राहत नव्हतं. हेही वाचा- सिद्दीकींना आधी जिवंत पकडलं मग..;तालिबानच्या क्रूरतेचा अफगाण सैन्यानी वाचला पाढा ही हवेली एकूण दोन एकर जागेवर बांधण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध हॉटेल बेल एअर आणि बेल एअर कंट्री क्लबपासून ही हवेली हकेच्या अंतरावर आहे. अगदी चालतही याठिकाणी जाता येऊ शकतं, इतक्या जवळ आहे. त्यामुळे या हवेलीची किंमत 2 अब्ज डॉलर्स इतकी असणं न्याय्य आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओसामा बिन लादेननं 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला केला होता, तेव्हापासून इब्राहिमनं या हवेलीत राहणं बंद केलं होतं. हेही वाचा- पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच सडणार, आतंकवादी मसूद अजहरबाबत ठोस पुरावा हाती 1931 साली बांधण्यात आलेल्या या आलिशान हवेलीत एकूण सात बेडरूम आणि पाच बाथरूम आहेत. तसेच, इमारतीच्या बाह्य भागात बरीच मोकळी जागा आहे. ओसामा बिन लादेनचा भाऊ इब्राहिम बिन लादेन त्याची माजी पत्नी क्रिस्टीनसोबत याठिकाणी राहत होता. पण 9/11 च्या हल्ल्यानंतर लादेन बंधुच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यानं याठिकाणी राहणं बंद केलं होतं.