JOIN US
मराठी बातम्या / विदेश / India - China: आम्हा दोघांमध्ये कुण्या तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही; चीनने ट्रम्प यांची ऑफर धुडकावली

India - China: आम्हा दोघांमध्ये कुण्या तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही; चीनने ट्रम्प यांची ऑफर धुडकावली

चीन आणि भारतामध्ये कुणी तिसऱ्याने मध्यस्थी करायची गरज नाही, अशा शब्दांत चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं धुडकावून लावलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मे : चीन आणि भारतामध्ये कुणी तिसऱ्याने मध्यस्थी करायची गरज नाही, अशा शब्दांत चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं धुडकावून लावलं आहे. शुक्रवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे झाओ लिजियन यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीच्या ऑफरवर ही टिप्पणी केली. आशियातल्या या दोन महासत्तांमध्ये सुरू असलेल्या सीमावादावर आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत भारताने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली होती. चीनने मात्र शुक्रवारी स्पष्ट शब्दात अमेरिकेची ऑफर धुडकावून लावली आहे . ट्रम्प असंही म्हणाले होते की, ‘मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. तेव्हा ते त्या मोठ्या वादग्रस्त मुद्द्यावरून नाखूष दिसले. मी त्या दोन देशांमधल्या सीमावादावर मध्यस्थीला तयार आहे." चीनमुळे वाढणार जगाची डोकेदुखी, कोरोना पसरवणारा ‘तो’ बाजार पुन्हा झाला सुरू ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये कुठलीही चर्चा नजिकच्या काळात झालेली नाही, असं सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं होतं. ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यानंतर, ‘भारत चीनबरोबरचे सर्व वाद शांततेच्या मार्गाने चर्चेतून सोडवत आहे.’ अशी सावध प्रतिक्रिया भारतातर्फे देण्यात आली होती. पण चीनने मात्र अमेरिकेचं म्हणणं स्पष्ट शब्दांत धुडकावलं आहे. आमच्यातला सीमावाद सोडवण्यासाठी आम्हाला तिसऱ्या कुणाची आवश्यकता नाही, असं चीनतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

अद्याप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे ट्रम्प यांच्या ट्वीटवर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. पण चीनचं सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाईम्सने छापलेल्या लेखात मात्र दोन्ही देशांना अशा कुठल्याही मदतीची किंवा तिसऱ्याच्या मदतीची गरज नसल्याचं म्हटलेलं आहे. अन्य बातम्या कोरोनाच्या संकटकाळात हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा जगातली सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट तयार, 1 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान कोरोनाच्या संकटकाळात हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या