उत्कटतेनं बोलताना हृदयविकाराचा झटका
नवी दिल्ली 25 जुलै : अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला पटवून देण्याकरता किंवा आपलं म्हणणं मांडण्याकरता आपण जोरजोरात ओरडतो आणि उत्कटतेनं बोलतो. मात्र ही गोष्टी जीवावरही बेतू शकते. अशीच एक हादरवणारी घटना आता समोर आली आहे. कॅलिफोर्निया विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या जातीय भेदभावविरोधी विधेयकाविरूद्ध लढा देणाऱ्या भारतीय-अमेरिकी मागासवर्गीय कार्यकता मिलिंद मकवाना यांचं निधन झालं आहे. डॅाक्टरांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? 5 वर्षांनंतर महिलेच्या पोटात सापडला चिमटा मकवाना हे क्युपर्टिनोच्या सभेत विधेयकाविरोधात बोलत होते. याबद्दल उत्कटतेनं बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या अशा निधनाने देशातील हिंदू - अमेरिकी समुदायाला मोठा धक्का बसला आहे. कॅनेफोर्निया राज्यात वांशिक भेदभावावर बंदी घालणारं SB-403 हे विधेयक आहे. हे विधेयक मे महिन्यात राज्याच्या विधानसभेत मंजूर केले गेले होते. कॅलिफोर्निया हे भेदभाव विरोधी कायद्यात संरश्रित श्रेणी म्हणून वांशिक भेदभावाला समाविष्य करणारं पहिलंच अमेरिकी राज्य आहे. जातविरोधी विधेयक SB-403 मंजूर झाल्यामुळे कॅलिफोर्निया राज्यातील सर्व लोकांना समान घरं, फायदे आणि सुविधा मिळू शकतील. अचानक काय येतो हृदयविकाराचा झटका काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसते. अशात अनेकदा हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. शरीरामध्ये बी-12 कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. यात रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो.