JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जगातली सर्वात मोठी बातमी: हुकूमशहा किम जोंग उन गेला कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा

जगातली सर्वात मोठी बातमी: हुकूमशहा किम जोंग उन गेला कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा

चीनी डॉक्टरांचं एक पथक उत्तर कोरियात दाखल झालं असून ते किमच्या औषधोपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात

या शेतात हुकूमशाहाच्या सुरक्षारक्षकांसाठी भाज्या आणि अन्य गोष्टींची पिकं घेतली जातात. याच शेतात राजकीय कैद्यांचे मृतदेह खतं बनवण्यासाठी वापरले जातात. यातून शेतीचं पिकही चांगलं येतं असं इथल्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हाँगकाँग 25 एप्रिल: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या प्रकृतीविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. किम हा कोमात गेला असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymai lने केला आहे. त्यासाठी त्यांनी हाँगकाँगच्या एका पत्रकाराचा हवालाही दिला आहे. महिनाभरापूर्वी त्याचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. ती पुन्हा सुधारूच शकली नाही. उत्तर कोरियात किमच्या प्रकृतीबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. दरम्यान चीनी डॉक्टरांचं एक पथक उत्तर कोरियात दाखल झालं असून ते किमच्या औषधोपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र देश आहे. त्यामुळे चीनचं तिथल्या घडामोडींकडे लक्ष आहे. मात्र त्याबाबत कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. दरदिवशी किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे चर्चा सुरू झाल्या. मात्र दक्षिण कोरियानं या वृत्ताचे खंडन केले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या सर्वात ताकदवान नेत्याची शस्त्रक्रिया त्यांच्या खासगी रुग्णालय आणि अत्यंत विशिष्ट डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याची, माहिती आहे.

‘जर हे खरं असेल तर…’, किम यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया

उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किमवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्यंग सॅन येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. एनके डेली या वेबसाइटनुसार, किम यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या ह्यंग सॅनमधील डॉक्टरांची नेमणुक केवळ किम यांच्या कुटुंबावर उपचार करण्यासाठी करण्यात आली होती.

किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

2014मध्ये किमची यांची प्रकृती नाजूक होती, तेव्हा सुद्धा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. 1994 मध्ये किमचे आजोबा किम इल सुंग यांच्या निधनानंतर हे रुग्णालय बांधले गेले. जगातील इतर कोणत्याही देशाचा याचा मागमूस येऊ नये म्हणून हे हॉस्पिटल हॉंग सॅनमध्ये बांधले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या