JOIN US
मराठी बातम्या / विदेश / विचित्र चोर! पोलिसांनी घरात छापा मारला तेव्हा सापडला महिलांच्या अंतर्वस्त्रांचा ढीग

विचित्र चोर! पोलिसांनी घरात छापा मारला तेव्हा सापडला महिलांच्या अंतर्वस्त्रांचा ढीग

पोलिसांनी महिलांची अंतर्वस्त्र (Women’s underwear) चोरली म्हणून एकाला अटक केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 8 सप्टेंबर : कुठेही चोरी घडली की ती चोरी ही पैसा अथवी दागिने या बाबत असते. पण तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की एखादा चोर (Thief) महिलांचे अंतर्वस्त्र चोरत असावा. तर ही चोरी घडलेली आहे. जपानमध्ये एका चोराला पोलिसांनी महिलांची अंतर्वस्त्र (Women’s underwear)चोरली म्हणून अटक केली आहे. त्यानंतर त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे. त्याने याआधी अनेक चोऱ्या केल्या असून त्या फक्त महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या चोऱ्या आहेत. त्यामुळे आता महिलांच्या अंतर्वस्त्राचीही चोरी होऊ शकते, आणि त्याचा साठा ही चोर करून ठेऊ शकतो. असा धक्कादायक गुन्हा जपानमध्ये घडला आहे. ही चोरीची घटना ही जपानमधील ओइटा (Oita) शहराची आहे. ज्यात पोलीसांनी 56 वर्षीय टेटसुओ उराटा (Tetsuo Urata) याला ताब्यात घेतले आहे. हा चोर लॉन्ड्रीतून महिलांची अंतर्वस्त्रे चोरत होता. पोलिसांनी त्याच्या घराची चौकशी केली असता त्यांना घरातील महिलांच्या अंतर्वस्त्रांचा ढीग बघून धक्काच बसला होता. त्यामुळे कपडेचोरीही होत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

संतापजनक! मुलीने चोरी करताना पाहिलं म्हणून केली हत्या, घरातच गाडला मृतदेह

आता सोशल मिडीयावर (Social Media) काही लोक या चोरीच्या घटनेला विनोदी पद्धतीने घेत आहे. त्यामुळे आता कपड्यांनाही लॉकरमध्ये ठेवावे की काय असा प्रश्न काही यूजर्स विचारत आहेत.जपानमधाल स्थानिक पोलिसांनी या कपड्यांचा फोटो शेयर केला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली होती, ज्यात 65 वर्षीय चोराने महिलांची अंतर्वस्त्रे चोरली होती. अशा पद्धतीनेही महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी होऊ शकते हे बघून जपानी पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या