JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाचं थैमान: अमेरिकेत पुढच्या दोन महिन्यात होऊ शकतो 1,37000 जणांचा मृत्यू

कोरोनाचं थैमान: अमेरिकेत पुढच्या दोन महिन्यात होऊ शकतो 1,37000 जणांचा मृत्यू

अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये तर लॉकडाऊन विरुद्ध लोकांनी मोर्चे काढले, मृत्यूपेक्षा आम्हाला आमचं स्वातंत्र प्रिय आहे असं त्यांचं मत आहे.

जाहिरात

People leave the Union Square Green Market Saturday, May 2, 2020, in New York. (AP Photo/Frank Franklin II)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क 11 मे: कोरोना व्हारसची सुरूवात ही चीनमधून झाली असली तरी त्याचा सर्वात जास्त फटका हा अमेरिकेला बसला आहे. जगातला हा सर्वात शक्तिशाली देश हादरून गेला असून अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक बळी कोरोनाने घेतले आहेत. पुढच्या दोन महिन्यांमध्ये अमेरिकेत 1 लाख 37 हजार जणांचा बळी जाऊ शकतो असा अंदाज वॉशिंग्टन विद्यापीठाने (University of Washington) व्यक्त केल्याचं वृत्त CNNने दिलं आहे. अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा हा 13 लाख 21 हजार 223वर गेला असून 79 हजार 58 जणांचा मृत्यू झाला आहे. दरररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर मृत्यूचा आकडा हा त्याच्या पुढेही जाऊ शकतो असा अंदाज विद्यापीठाच्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकन लोकांचं जास्त प्रमाणात घराबाहेर पडणे हेच मृत्यू वाढण्याचं मुख्य कारण या अहवालात देण्यात आलं आहे. लोक घरात राहत नाहीत, नियमांचं काटेकोर पालन करत नाहीत त्यामुळे कोरोना झपाट्याने पसरत चालला आहे. अमेरिकेत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेलं नाही. त्याच बरोबर सक्तीही करण्यात आलेली नाही. तिथल्या काहीच राज्यांनीच फक्त अंशत:लॉकडाऊन केलं. लोकांसाठी फक्त गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. जे आतापर्यंत झालं नाही ते कोरोनानं केलं, लाखो लोकांना ‘या’ वाईट सवयीतून सोडवलं अनेक राज्यांमध्ये तर लॉकडाऊन विरुद्ध लोकांनी मोर्चे काढले, मृत्यूपेक्षा आम्हाला आमचं स्वातंत्र प्रिय आहे असंही या लोकांचं टोकाचं मत आहे. हे वाचा -  मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यास चीनला 5 वर्ष द्यावी लागेल मोठी भरपाई कोरोनाचं केंद्र झालेल्या वुहानमधून 36 दिवसांनी पहिल्यांदाच आली वाईट बातमी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या