JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Russia-Ukraine War: 'युद्धाचा परिणाम काहीही असो पण आम्ही....'; आण्विक हल्ल्याबाबत रशियाने केलं मोठं विधान

Russia-Ukraine War: 'युद्धाचा परिणाम काहीही असो पण आम्ही....'; आण्विक हल्ल्याबाबत रशियाने केलं मोठं विधान

या बैठकीदरम्यान रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि दुसरं मोठं शहर चेर्निहिन येथे आपल्या लष्करी कारवाया कमी करणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे युक्रेननेही आंतरराष्ट्रीय हमीसह तटस्थता ऑफर स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.

जाहिरात

russia ukraine war

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कीव 30 मार्च : रशिया युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) सुरुवात होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. तुर्कीच्या इस्तांबुल शहरात रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही देशांनी सकारात्मक संदेश दिले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि दुसरं मोठं शहर चेर्निहिन येथे आपल्या लष्करी कारवाया कमी करणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे युक्रेननेही आंतरराष्ट्रीय हमीसह तटस्थता ऑफर स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. युक्रेनियन वार्ताकारांनी बैठकीनंतर विधान केलं, की त्यांनी अशी स्थिती प्रस्तावित केली आहे ज्यामध्ये ते कोणत्याही युतीमध्ये सामील होणार नाहीत. तसंच त्यांच्या भूमीवर परदेशी सैन्याचं आयोजन करणार नाहीत. मात्र याबदल्यात त्यांनी आर्टिकल 5 अंतर्गत सुरक्षेची हमी द्यावी लागेल.

एका व्हिडीओने जगभरात भितीचं वातावरण! रशियाशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक चालेल का? नासाने दिलं उत्तर

यापूर्वी मीटिंग सुरू होण्याआधी दोन्ही देशांनी फार उत्साह दाखवला नाही. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी हातमिळवणीही केली नाही. इस्तांबुलमध्ये दोन्ही पक्षांची पहिल्यांदाच समोरासमोर बातचीत झाली. या बैठकीआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या एका पत्रावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भडकले होते आणि त्यांना इशारा देत झेलेन्स्की यांना म्हटलं होतं, की बर्बाद करेल. या पत्रात झेलेन्स्की यांनी पुतिन यांना कोणत्याही अटीशिवाय हे युद्ध समाप्त करण्यास म्हटलं होतं. हे पत्र चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोविच यांच्या माध्यमातून क्रेमलिन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं होतं. द टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हे पत्र वाचताच पुतिन भडकले आणि त्यांनी अब्रामोविच यांना म्हटलं की त्यांना सांगा, मी त्यांना पूर्णपणे बर्बाद करेल. पुतिन म्हणाले, की झेलेन्स्की यांनी आमच्या सगळ्या अटी मान्य कराव्या अन्यथा परिणाम वाईट होतील. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं की युक्रेनच्या सैन्य क्षमतेत एका महिन्यात मोठी घट झाली आहे. यामुळे रशियाने आपलं लक्ष्य पूर्ण करत पहिला टप्पा पार केला आहे. आता रशिया युक्रेनवरील हल्ल्याचा दुसरा टप्पा सुरु करू शकतं. रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यवहार रुपयांमध्ये नाही तर डॉलर्समध्ये होणार, पेट्रोलियम राज्यमंत्र्यांची माहिती रशियाने इशारा दिला आहे, की जर नाटो देशांनी युक्रेनला विमान आणि हवाई रक्षा साधणांचा पुरवठा केला तर रशियाकडूनही त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, क्रेमलिनचे प्रवक्ता दमित्री पेस्कोव यांनी युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबद्दलच्या गोष्टीवरही स्पष्ट विधान केलं. रशियाने म्हटलं आहे, ते युक्रेनवर आण्विक हत्यारांचा वापर करणार नाहीत. मात्र रशियाच्या अस्तित्वाला काही धोका असल्याचं जावणल्यास याचा वापर करण्यात येईल. असं मानलं जात आहे, की ही पुतिन यांची युक्रेन आणि नाटो देशांना थेट धमकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या