ओस्लो, 04 जून : एकीकडे संपूर्ण जग कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी दोन हात करत असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीही येत आहेत. उत्तर नॉर्वेमध्ये चक्क भूस्खलनामुळं संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं. 2 हजार फूटपेक्षा जास्त रुंदीच्या शक्तिशाली भूस्खलनाने उत्तर नॉर्वेमधील आठ घरे समुद्रात गेली. ही परिस्थिती काही तास अशीच होती अखेर रिस्क्यू ऑपरेशन करून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान, अद्याप यात जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे. उत्तर नॉर्वेच्या अल्टा येथील नगरपालिकेत कृष्णसेटच्या पश्चिमेला बुधवारी दुपारी 2 हजार फूट रुंद आणि 500 फूट उंच भूस्खलन झाले. दुपारी 3.45 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि हवाई आणि समुद्राद्वारे तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. एका स्थानिका रहिवाश्यानं हे चित्र आपल्या कॅमेरात टिपलं. अल्तापोस्टेन या युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्यक्तीला जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर धाव घेतली, तेव्हा त्यानं 8 घर समुद्राच्या दिशेनं जाताना पाहिली. वाचा- मुसळधार पावसानंतर रस्त्यावर कोसळली दरड, पाहा LIVE VIDEO
वाचा- निसर्ग चक्रीवादळामध्ये तुफान VIRAL होतोय हा VIDEO, पाहून पोट धरून हसाल दरम्यान सध्या भूस्खलनामुळं पोलीस या जागेत प्रवेश करून शकत नव्हते. अखेर सायंकाळी 7च्या सुमारास बचाव कार्य बंद करण्यात आले. पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर या परिसरात कोणी नसल्याची माहिती दिली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मुख्य घटनेनंतर काही तासांत अनेक लहान भूस्खलन झाले. नॉर्वेजियन जलसंपदा आणि ऊर्जा संचालनालय (NVE) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, विशेषत: अधिक भूस्खलनाचा धोका आहे. NVEचे जिल्हा अभियंता अँडर्स बोजोरदल लोकांना काही दिवस सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. वाचा- क्षणात झालं होत्याचं नव्हतं, निसर्ग चक्रीवादळाचे थरारक VIDEO