JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंड, म्हणाले 'मी निर्दोष तरीही...'

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंड, म्हणाले 'मी निर्दोष तरीही...'

सुनावणीसाठी आलेल्या ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केलं होतं, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क : पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा मॅनहॅटन कोर्टाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 1 लाख 22 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ते कोर्टात आले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन मिळाला आहे. सुनावणीसाठी आलेल्या ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केलं होतं, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप आहे. ज्यात 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देणे आणि खोटी कागदपत्रे तयार हा एक गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टात ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

युक्तिवादानंतर न्यायालयाने ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलर दंड भरण्याचे आदेश दिला. यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. दंडाची रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला दिली जाईल. सुनावणीनंतर ट्रम्प कोर्टातून बाहेर पडले. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रकरणात अटक होणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

Donald Trump : आत्मसमर्पणासाठी ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये दाखल, कडेकोट सुरक्षा व्यवस्था

संबंधित बातम्या

मॅनहॅटन कोर्टाबाहेर ट्रम्प यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आत आणि बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणातील त्यांच्यावर असलेले आरोप कोर्टात फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालयाने ट्रम्प अध्यक्ष असताना तपास सुरू केला होता, त्यावरच सध्या ही सुनावणी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या