JOIN US
मराठी बातम्या / विदेश / दारू पार्टी करणाऱ्या पंतप्रधानांबाबत मोठा खुलासा; Video लीक झाल्यानंतर आता Drug test रिपोर्ट आला

दारू पार्टी करणाऱ्या पंतप्रधानांबाबत मोठा खुलासा; Video लीक झाल्यानंतर आता Drug test रिपोर्ट आला

पंतप्रधानांच्या दारू पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी होऊ लागली.

जाहिरात

पंतप्रधानांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल,

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हेलसिंकी, 23 ऑगस्ट : पंतप्रधान जे देशाचे प्रमुख असतात. देशातील नागरिकांचे ते कुटुंबप्रमुख. देशाला संबोधित करताना, जगातील बड्याबड्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात. पण काही दिवसांपूर्वी अशा पंतप्रधानांचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्या मित्रमैत्रिणींसोबत दारू पार्टी करताना दिसल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि  त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली.फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन एका पार्टीत डान्स करत धिंगाणा घालताना दिसल्या. त्या पार्टीत दारूचे ग्लासही दिसले.  सना मरीन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचा हा पार्टीचा व्हिडीओ @visegrad24 ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहू शकता, ज्यात त्या आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत नाचताना, गाताना दिसत आहे. या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीनेच हा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हे वाचा -  ब्रिटिश महिलांची वेश्याव्यवसायात येण्याची टक्केवारी वाढली, धक्कादायक कारण समोर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सना यांची ड्रग टेस्ट केली जावी अशी मागणी जोर धरू लागली. अखेर सना मरीन यांनी आपली टेस्ट करवून घेतली, ज्याचा रिपोर्ट आता आला आहे.

संबंधित बातम्या

मीडिया रिपोर्ट नुसार सना यांनी ड्रग न केल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यांच्या रक्ताच्या आणि लघवीच्या नमुन्यात कोणत्याही प्रकारचे ड्रग आढळलं नसल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. हे वाचा -  धक्कादायक! डॉगीने खाल्ली स्वतःचीच शेपटी मालकाला झाली अटक; नेमकं प्रकरण काय? रिपोर्ट नुसार या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना सना मरीन म्हणाल्या होत्या, “कुणीतरी आपला व्हिडीओ बनवत आहे हे आपल्याला माहिती होतं, पण हा व्हिडीओ सार्वजनिक केल्याने मला वाईट वाटतचं आहे.  मी पार्टी केली, पार्टीत डान्स केला, गाणं गायलं. हे सर्वकाही कायदेशीर आहे” “माझं एक कौटुंबिक आयुष्य आहे आणि एक प्रोफेशनल. जेव्हा थोडासा वेळ मिळतो तेव्हा मित्रमैत्रिणींसोबत घालवते. मला माझ्या वागणुकीत कोणताही बदल करण्याची गरज नाही. मी जसे होते, तसेच कायम राहणार”, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या