नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : जगातील आघाडीचे मायक्रो-ब्लॉगिंग अॅप असेलेले ट्विटर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्याकडे आले आहे. मस्क यांनी पदभार स्वीकारताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आज(दि.28) रोजी ट्विटर अधिग्रहणच्या अंतिम मुदतीपूर्वीच त्याचे नवीन मालक बनले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नेड सेगल यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : उत्तर कोरियाच्या एका निर्णयाने अमेरिका नरमली; शत्रुत्व सोडून डायरेक्ट चर्चेसाठी तयार
एलॉन मस्क यांनी ट्वीटरवर ताबा घेताच पहिल्यांदा ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांना ट्विटरच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आल्याचेही वृत्त आहे. ट्विटरच्या कायदेशीर टीमच्या प्रमुख विजया गड्डे यांनाही बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
इलॉन मस्क यांनी ट्विटरवर याबद्दलची एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी ट्विटर का विकत घेतले आणि जाहिरातीबद्दल मला काय वाटते याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यापैकी बहुतेकजणांनी चुकीचा निष्कर्श काढला आहे. याचे कारण म्हणजे आपल्या भविष्यातील सभ्यतेमध्ये समानता असली पाहिजे. डिजिटल जगतात जिथे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. या डिजीटल जगात श्रद्धा,हिंसा याव्यतीरिक्त निरोगी चर्चा करू शकतात. यासाठी मी ट्वीटर घेतलं असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : सुनक यांच्या आई-वडिलांची प्रार्थना वैष्णोदेवीने ऐकली! निवडणुकीपूर्वीचा तो फोटो व्हायरल
मस्कने कोणत्या धोक्याचा उल्लेख केला?
इलॉन मस्कने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सध्या इतका मोठा धोका आहे की सोशल मीडिया कट्टरपंथी उजवे आणि कट्टरपंथी डावे यांच्यात विभागले जाईल आणि आपल्या समाजात अधिक द्वेष पसरवेल. अधिक क्लिकच्या शोधात, बहुतेक पारंपारिक माध्यम संस्थांनी या कट्टरतावादाला खतपाणी घातले आहे कारण त्यांना वाटते की यातून पैसा येतो. पण असे करताना संवादाची संधी गमावली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.