JOIN US
मराठी बातम्या / विदेश / डोनाल्ड ट्रम्प यांचे पाय आणखी खोलात, विमानात लैंगिक छळ केल्याचा महिलेकडून आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाय आणखी खोलात, विमानात लैंगिक छळ केल्याचा महिलेकडून आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा कोर्टात करत आरोप फेटाळून लावले आहेत.

जाहिरात

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाय आणखी खोलात जात आहेत. त्यांच्यावर आधीच लैंगिक शोषण केल्याचा आरोप असतानाच आता आणखी एका महिलेनं विमानात लैंगिक छळ केल्याचा दावा करत कोर्टात आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा कोर्टात करत आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले. न्यूयॉर्क इथे कोर्टात सुरू असलेल्या केस दरम्यान या महिलेनं दावा केला, की 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना लैगिंक छळ केला. लेखक ई. जीन कॅरोल यांच्या बलात्कार आणि मानहानीच्या प्रकरणात माजी राष्ट्रपतींविरुद्ध साक्ष देताना जेसिका लीड्स यांनी हे आरोप केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, लेखिकेनं केला लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली माझ्यावर….

डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक छळाचे सर्व आरोप फेटाळले असले तरी. लीड्सने यांनी कोर्टात दावा केला की, ट्रंप यांनी 1978 किंवा 1979 मध्ये न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमध्ये त्यांचा स्कर्ट वर करत लैंगिक छळ केल. लीड्स, आता 81 वर्षांच्या आहेत. आम्ही बिझनेस क्लासमध्ये एकमेकांशी बोललोही नाही. त्यांनी थेट लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला असाही दावा या महिलेनं केला आहे.

लेखिका आणि एडल्ट स्टारने लैंगिक शोषण केल्याचा आरोप 2016 च्या मतदानापूर्वी पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपात डोनाल्ड ट्रम्प दोषी असल्याचं सांगण्यात आलं होतं. जॉर्जियाच्या दक्षिणेकडील राज्यात ट्रम्प यांची निदर्शने, व्हाईट हाऊसमधून घेतलेल्या कागदपत्रांची कथित गैरव्यवहार आणि 6 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या समर्थकांकडून यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग याचीही चौकशी केली जात आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंड, म्हणाले ‘मी निर्दोष तरीही…’

संबंधित बातम्या

एका लेखिकेनंही त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. या सगळ्यामुळे ट्रम्प यांचे पाय आणखी खोलात जात असून त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या