JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाग्रस्त रुग्णाचा X-ray आला समोर, भयंकर फोटो पाहून बसणार नाही विश्वास

कोरोनाग्रस्त रुग्णाचा X-ray आला समोर, भयंकर फोटो पाहून बसणार नाही विश्वास

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची दहशत वाढत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वुहान, 13 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची दहशत वाढत आहे. एकीकडे कोरोना वाऱ्यासारखा पसरत असताना या संदर्भातील लस अद्याप उपलब्ध नाही आहे. यातच एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा एक्स-रे रिपोर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये चीनमधील व्यक्तीच्या फुफ्फुसांची झालेली वाईट अवस्था दिसत आहे. या चित्रांमध्ये कोरोना विषाणू फुफ्फुसात कसा प्रवेश करतो आणि श्वासोच्छ्वास थांबवते, हे दिसत आहे. या एक्स-रेमध्ये तुम्हाला बर्‍याच पांढर्‍या रेषा दिसत आहेत. या एक्स-रेमध्ये दिसणाऱ्या रेडिओलॉजिस्ट म्हणजेच, ज्या ठिकाणी फुफ्फुसांमध्ये हवा असावी तेथे कोरोना विषाणू विकसित झाला आहे. तो त्या ठिकाणी श्लेष्मा बनवित आहे. यामुळे लोकांना श्वास घेण्यास अडचण भासत आहे. वाचा- सावधान… ‘कोरोना’चा खोटा WhatsApp मेसेज Forward करणारी शिक्षिका निलंबित

वाचा- ‘कोरोना’चा कहर : दफनविधीसाठी इराणमध्ये रात्रीतून मैदानात खोदल्या जाताहेत ‘कबर’ जगभरातील डॉक्टरांना कोरोना व्हायरस रूग्णांच्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये अशाच पांढर्‍या रॅशेस दिसत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विषाणु सर्व आजारांपेक्षा भयंकर आहे.. कोरोनातील सर्व रूग्णांच्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये रेडिओलॉजिस्ट अधिक दिसत आहे. वाचा- IPLमध्ये कोहलीच्या संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (RSNA) यांनी हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या सोसायटीने सुमारे 1000 रूग्णांची तपासणी केली आहे. सर्वांच्या छातीचे एक्स-रे आणि सीटी स्कॅन झाले आहेत. यानंतर, प्रत्येकाच्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये समानता आढळली. वाचा- Google च्या ऑफिसमध्ये धडकला ‘कोरोना’; भारतातील ऑफिस बंद

सध्या व्हायरल होत असलेला एक्स-रे हा वुहान येथील 54 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसांचा आहे. यात COVID-19मुळे या महिलेच्या शरिरात न्यूमोनियाचा भयानक स्तर पाहायला मिळत आहे. होता. या महिलेला श्वास घेण्यात इतकी अडचण होती की तिला ऑक्सिजन द्यावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या