JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अंत्यसंस्कार केल्यानंतर जिवंत सापडली महिला, रुग्णालयातूनच केला घरी फोन आणि...

अंत्यसंस्कार केल्यानंतर जिवंत सापडली महिला, रुग्णालयातूनच केला घरी फोन आणि...

अंत्यसंस्कार केल्यानंतर जिवंत मिळाली कोरोना संशयित महिला, परिवारासह-डॉक्टरही झाले हैराण. वाचा नेमकं काय घडलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वायाकिल, 28 एप्रिल : कोरोनानं साऱ्या जगात थैमान घातला आहे. सर्व देश सध्या कोरोनाशी दोन करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण अमेरिकेजवळ असलेल्या इक्वेडोर येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेनं आपल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र दोन दिवसांनी तिची बहीण जिवंत असल्याचे समजताच तिची झोप उ़डाली. खरं तर, ग्वायाकिल शहरात राहणारी 74 वर्षीय अल्बा मारूरी यांना 27 मार्च रोजी उच्च ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यानं एबल गिलबर्ट पोंटॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनासारख्या लक्षणांमुळे, डॉक्टरांनी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केलं. अल जजीरा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांनंतर अल्बाची बहीण ऑरा मारूरी यांना रुग्णालयातून फोन आला. त्यांना रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की त्यांची बहीण अल्बा यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जा. अल्बा कोरोनासंशयित असल्यामुळं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटूंबाला अंतर ठेवून अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. वाचा- ‘मी जिवंत आहे’, डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक VIDEO अल्बाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब दु:खी होते. अशातच काही दिवसांनंतर पुन्हा अल्बाची बहीण ऑरा यांना रुग्णालयातून फोन आला. त्यांना सांगण्यात आले की अल्बाला तुमच्याशी बोलायचं आहे. हे एकूण ऑरा घाबरली, तिला तिच्या कानांवर विश्वास बसला नाही. त्यानंतर तिला कळलं की अल्बा खरच जिवंत आहे. अल्बानं फोन केल्यानंतर काही तासांनी एक रूग्णवाहिका ऑरा मारुरीच्या घरी आली. वाचा- शहरात अडकलेल्या मजुरांना गावची दारं बंदच? सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नाहीच रूग्णालयातील कर्मचारीही रुग्णवाहिकेत डॉक्टरसमवेत उपस्थित होते. त्यांनी अल्बाच्या कुटूंबाची माफी मागितली आणि असं सांगितलं की, रुग्णालयाकडून चूक झाली आहे. चुकून अल्बाच्या कुटूंबाकडे दुसर्‍या कोणाचा तरी मृतदेह देण्यात आला. ज्यावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या सगळ्या घटनेचा धक्का ऑराला बसला आहे. ऑराच्या कुटुंबियांना त्यांनी कोणाच्या मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कार केले हे त्यांना ठाऊक नाही. दुसरीकडे, अ‍ॅबिल गिलबर्ट पोंटन हॉस्पिटलने आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही आहे. वाचा- लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीमध्ये रंगला लुडोचा डाव, जिंकणारा थेट रुग्णालयात दाखल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या