JOIN US
मराठी बातम्या / विदेश / एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना; एकही रुग्ण नाही

एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना; एकही रुग्ण नाही

1.25 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर आतापर्यंत सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सगळ्यातही स्पेनमधील एका शहरात अजूनही कोरोना पोहचू शकला नाही आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मार्दिद, 05 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. हा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहोचवू नये म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी लॉकडाउन लागू केले आहे. स्पेनमध्ये विषाणूमुळे मोठा विनाश झाला आहे. येथे सुमारे 1.25 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर आतापर्यंत सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सगळ्यातही स्पेनमधील एका शहरात अजूनही कोरोना पोहचू शकला नाही आहे. संपूर्ण जगाशी तोडला संबंध 14 मार्च रोजी दक्षिण स्पेनमधील जहारा दे ला सियरा या शहराने कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी संपूर्ण जगापासून स्वत: ला अलग केले. हे शहर नेहमी शत्रूंना पळवण्यासाठी ओळखला जातो. या शहराचे मेयर सॅन्टियागो गॅलोइस यांनी 14 मार्च रोजी शहरातील पाचही प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी त्यांनी प्रवेशद्वार बंद केले. शहर प्रशासनाने सर्व घरात सामान पोहोचवण्यासाठी दोन महिलांची नेमणूक केली आहे. यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी जमत नाही. वाचा- अस्सलाम अलैकुम! ‘आम्हाला तुमचा अभिमान’, पाकने केले Air Indiaचे कौतुक ****फक्त महत्त्वाच्या वस्तूंचा होणार पुरवठा शहरातील पाच प्रवेशद्वारांपैकी चार प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्याच वेळी, प्रवेशद्वारावर लोकांना पोस्ट केले गेले आहे. हे लोक कोणत्याही वाहनांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय येथे येण्यास परवानगी देत ​नाहीत. सर्व गाड्यांमध्ये पाण्याचे आणि ब्लीचद्वारे फवारणी केली जाते. त्यानंतर साबणाने भरलेल्या खड्ड्यातून जात आहे. अत्यावश्यक वस्तू असलेल्या कारशिवाय कोणालाही येथे प्रवेश करण्याची परवानगी नाही. दर सोमवारी आणि गुरुवारी 10 सदस्यांची टीम शहरभर स्वच्छतेचे काम करते. वाचा- लॉकडाऊनमध्ये गच्चीवर भजी करायला गेले, पोलिसांचा ड्रोन आला आणि… पर्यटकांना पाठवले माघारी जहारा एक अतिशय सुंदर शहर आहे. इथल्या इमारती मध्ययुगीन शैलीत बांधल्या गेल्या आहेत आणि तिथे ऑलिव्ह फॉरेस्ट देखील आहे. येथे फिरायला जगभरातून पर्यटक येतात. मात्र या शहराने प्रवेशद्वार बंद केल्यानंतरही पर्यटक येथे एक-दोन दिवस पोहोचत होते. मात्र त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आले. वाचा- VIDEO : चीनने आपल्या मित्रालाच दिला धोका, पाकला दिले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या