JOIN US
मराठी बातम्या / विदेश / इंग्लंड, फ्रान्समध्येही आता mask बंधनकारक; नाहीतर होणार ही शिक्षा

इंग्लंड, फ्रान्समध्येही आता mask बंधनकारक; नाहीतर होणार ही शिक्षा

UK मध्ये कोरोनाव्हायरसची नवी लाट येणार आहे आणि त्यासाठी तयार राहावं, असा इशारा अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 14 जुलै :  Coronavirus चा प्रादुर्भाव वाढत असल्याने इंग्लंड (UK) आणि फ्रान्सने (France) कुठल्याही दुकानात फेस मास्कशिवाय प्रवेश नाही, असा नवा नियम जाहीर केला आहे. सुरुवातीला या देशांमध्ये नाक, तोंड झाकणारा मास्क तोंडावर बांधा असं नुसतं आवाहन केलं होतं. आता मात्र नागरिकांनी बाहेर पडताना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. इंग्लंडमध्ये मास्कशिवाय बाहेर पडणाऱ्यांना 100 पाउंडपर्यंत (अंदाजे 10000 रुपये) दंड लावण्यात येणार आहे, असं हा नवा नियम सांगतो.  24 जुलैपासून हा नियम अंमलात येईल अशी बातमी बीबीसी ने दिली आहे. कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना मास्क लावणं बंधनकारक आहे. फ्रान्सनेही असाच नवा नियम जाहीर केला आहे. हे वाचा -  कोरोनाचं थैमान असतांना या 3 गोष्टी भारतासाठी दिलासादायक, ICMRने दिली आकडेवारी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसने रिपोर्टनुसार यूकेमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट येणार आहे आणि ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या रिपोर्टनंतर आता इंग्लंड आणि फ्रान्ससह स्पेन, इटली, जर्मनी यासारख्या युरोपियन देशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विक्रेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर जास्त आहे. शिवाय मास्क घातल्याने लोकं सुरक्षित राहतात याचे पुरावेही आहात. दुकानांमध्ये मास्क घातल्याने ग्राहक आणि दुकानात काम करणारे कर्मचाऱ्यांची सुरक्षिततेची खात्री देता येते” हे वाचा -  धक्कादायक! नामांकित फार्मा कंपनीत कोरोनाचा शिरकाव, 20 कर्मचाऱ्यांना लागण “जर नागरिकांनी मास्क घालण्यास नकार दिला तर दुकानातील विक्रेते त्यांना दुकानात प्रवेश नाकारू शकतात किंवा पोलिसांनाही बोलवू शकतात”, असंही हॅनकॉक यांनी सांगितलं. दरम्यान हा नियम रिटेल कर्मचाऱ्यांना लागू नाही. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत यूके नवव्या स्थानावर आहे. यूकेमध्ये आता एकूण 290,133 कोरोना प्रकरणं आहेत. तर 44,830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या