कोरोना विषाणूचा प्रसार जास्त उष्णतेमध्ये कमी होतो, पण त्याचा अर्थ कोरोना थांबला असा नाही. त्यामुळे थंडी सुरू झाल्याचा याचा आणखी एक प्रकोप पाहायला मिळेल.
बीजिंग, 13 जून : चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरस कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा वेगानं बीजिंगमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. बीजिंग इथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून चीनमध्ये 10 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. बीजिंग इथे 56 दिवसांनंतर पुन्हा एकदा गुरुवारी 11 जूनला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.त्यानंतर पुन्हा शुक्रवारी 2 रुग्ण आढळले असल्यानं तातडीनं बीजिंगमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परदेशात अडकलेल्या लोकांना घेऊन जाणारी कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे किंवा विमान बीजिंगमध्ये दाखल झाले नाहीत. याशिवाय बीजिंगमधील सर्व उड्डाणं इतर शहरांकडे वळवण्यात आली आहेत.
हे वाचा- भारतातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 लाखाचा टप्पा, पुन्हा रेकॉर्डब्रेक वाढ बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी याआधी या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शहरातील इतर घाऊक बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. यानंतर मटण आणि इतर बाजारपेठाही पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी दोन महिन्यांपर्यंत कोणतेही खेळ बीजिंगमध्ये होणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. सध्याची स्थिती पाहता बीजिंकमध्ये खेळ सुरू करण्यात येणार नाहीत यासंदर्भात तिथल्या प्रशासन केंद्रानं एक नोटीस बजावली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची सुरुवात चीनच्या वुहानपासून झाली होती. त्यानंतर जवळपास 180 देशांमध्ये हा व्हायरस पसरला. हे वाचा- डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली 3 मजली इमारत, पाहा थरारक VIDEO हे वाचा- 7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि… संपादन- क्रांती कानेटकर