JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 'या' शहरात पडलाय मृतांचा खच, मशिदीच्या पार्किंगमध्ये अशी केली जातेय सोय; पाहा धक्कादायक VIDEO

'या' शहरात पडलाय मृतांचा खच, मशिदीच्या पार्किंगमध्ये अशी केली जातेय सोय; पाहा धक्कादायक VIDEO

ब्रिटनच्या सर्व मोठ्या शहरांमधील रुग्णालयात कोरोना पीडित व्यक्तींवर उपचार केले जातात आणि दररोज शेकडो मृत्यू देखील होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 25 एप्रिल : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात थैमान घातलेल्या या कोरोनानं ब्रिटनमध्येही शिरकाव केला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या 1, लाख 43 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर सुमारे 19 हजार 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारीही 5000 पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे, तर 768 लोकांचा मृत्यू यामुळे झाला आहे. ब्रिटनच्या सर्व मोठ्या शहरांमधील रुग्णालयात कोरोना पीडित व्यक्तींवर उपचार केले जातात मात्र दररोज शेकडो लोकांचा मृत्यू देखील होत आहेत. या कठीण परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी बर्मिंघममधील एका मशिदीनं मदतीचा  हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या कार पार्किंग क्षेत्रात तात्पुरते शवगृह तयार केले आहे. कोरोना पीडित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारात नेहमीपेक्षा जास्त काळजी घेतली जात आहे. न्यूयॉर्क आणि ब्राझीलमध्ये कोरोनामध्ये ठार झालेल्या लोकांना सामुहिकपणे दफन केले जात आहे. ब्रिटनमधील बर्मिंघॅममध्ये शेकडो मृत्यूंमुळे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाला अडचणी येत आहेत. येथे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ठेवण्यासाठी जागाच नव्हती, त्या दृष्टीने परिसरातील मशिदीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. वाचा- COVID-19:स्पायडर मॅन, सुपरमॅनने केल्या गाड्या सॅनिटाइझ तर बॅटमॅनने वाटले मास्क

संबंधित बातम्या

वाचा- लॉकडाऊनमुळे पायी घरी निघाली महिला रात्री शाळेत थांबली, नराधमांनी साधला डाव अन्.. मशिदीचे विश्वस्त मोहम्मद जाहिद यांनी AFP सांगितले की, शहरात कोरोना संक्रमणामुळे वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे मृतदेह ठेवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक होते. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, सामाजिक अंतरामुळे लोक खूप दुःखी आहेत कारण अंत्यसंस्कारासाठी लोकांना जात येत नाही. एका कुटुंबात सहा मुलगे आणि काहींमध्ये चार मुली असून सर्वजण अंत्यसंस्काराला जाऊ शकत नाहीत. कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. हे लक्षात घेऊन आम्ही तात्पुरती सोय केली आहे. या आठवड्यात मृत्यूची संख्या कमी झाली आहे, गेल्या आठवड्यात दररोज 6 किंवा अधिक लोक येथे आणले जात होते, असे जाहीद म्हणाला. वाचा- मुंबईत ‘आयसोलेशन सेंटर’साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी… युरोप आणि अमेरिकेत सध्या कोरोनाचा प्रसार अधिक होत असला तरी, हळुहळु प्रसार कमी होत असल्याचेही म्हंटले जात आहे. जगभरात सध्या 27 लाख 90 हजार 986 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाख 95 हजार 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या